Minister Abdul Sattar
Minister Abdul Sattar Agrowon
ॲग्रो विशेष

Minister Abdul Sattar : नुकसानग्रस्तांना मदत देण्यास शासन कटिबद्ध : सत्तार

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यास शासन कटिबद्ध असल्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांनी सांगितले.

जिल्ह्यातील कन्नड व सिल्लोड तालुक्यातील वादळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान (Crop Damage) झालेल्या भागाचा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंगळवारी (ता. 11) शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.

श्री. सत्तार म्हणाले, की अधिकाऱ्यांनी झालेल्या नुकसानीचे तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत. एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनामा पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कन्नड तालुक्यातील पाणपोई फाटा, औराळा, जेहुर, निपाणी तसेच सिल्लोड तालुक्यातील सोनअप्पावाडी, बोरगाव वाडी, भराडी, डोईफोडा शिवारातील अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली.

यावेळी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कन्नड तालुक्यातील जेहुर गावात गावकऱ्यांशी संवाद साधला.

राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हताश न होता धीर धरावा, सध्या राज्यात सातत्याने वातावरणातील बदलामुळे एक वेगळं निसर्गचक्र आपल्याला पाहायला मिळत आहे.

राज्यात आतापर्यंत तीन वेळा अशी आपत्ती आली असून गेल्या दोन्ही आपत्तींच्या संदर्भात पंचनामे पूर्ण करून सरकारने आतापर्यंत सर्वाधिक 12 हजार कोटींची मदत नुकसानग्रस्तांना दिली.

आताच्या झालेल्या नुकसानीचे युद्धपातळीवर पंचनामे सुरू असून ते लवकरच पूर्ण होतील. नुकसानग्रस्तांच्या मागे सरकार खंबीरपणे उभं आहे असे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

या पाहणी दौऱ्यात जिल्हा बँकेचे चेअरमन तथा माजी आमदार नितीन पाटील, व्हाइस चेअरमन अर्जुन पा. गाढे, शिवसेना जिल्हाप्रमुख भरतसिंग राजपूत, माजी जि.प.अध्यक्ष श्रीराम महाजन, माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, तहसीलदार संजय वारकड, उपविभागीय कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बरदे, यांच्यासह महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : विदर्भात गारपिटीचा इशारा

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

SCROLL FOR NEXT