Abdul Sattar: अब्दुल सत्तारांची पाहणी सुसाट; शेतकरी मात्र हताश

Team Agrowon

शनिवारी नगर जिल्ह्यातील नांदूर खुर्द व खंडाळा ता. रहाता येथे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या द्राक्ष बागेसह कांदा, मका पिकाची पाहणी केली.

Abdul Sattar | Agrowon

यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी साधला.

Abdul Sattar | Agrowon

यावेळी कृषी आयुक्त सुनिल चव्हाण, कृषि सह संचालक रफिक नाईकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यांच्यासह कृषी, महसूल व ग्रामविकास विभागाचे अधिकारी, कर्मचारी व परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

Abdul Sattar | Agrowon

अलीकडेच नाशिक जिल्ह्यात अस्मानी संकटाने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले असताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार मात्र घाईघाईने पाहणी दौरा करत आहेत असा आरोप शेतकऱ्यांनी केला होता.

Abdul Sattar | Agrowon

"आमच्या भागांची पाहणी अवघ्या काही मिनिटात उरकली. तसेच आमच्या मागण्याही कृषिमंत्र्यांनी ऐकल्या नाहीत,"अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती. 

Abdul Sattar | Agrowon

तसेच रात्रीच्या अंधारात पाहणी करून काय करणार आहेत? असा संतप्त सवालही शेतकऱ्यांनी उपस्थित केला होता.

Abdul Sattar | Agrowon

कृषिमंत्री अब्दुल सत्तार सध्या नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर आहेत.

Abdul Sattar | Agrowon
Abdul Sattar | Agrowon