Farmer Accident Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Accident Insurance : अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबांना आधार

Agriculture Scheme : शेती व्यवसाय करताना अनेक वेळा अपघात होतात. राज्य सरकारतर्फे अशा अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत मदतीचा हात देण्यात येत आहे.

Team Agrowon

Raigad News : शेती व्यवसाय करताना अनेक वेळा अपघात होतात. राज्य सरकारतर्फे अशा अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत मदतीचा हात देण्यात येत आहे. जिल्ह्यात २०२४-२५ या आर्थिक वर्षात ४७ शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख, अपघातामुळे एक किंवा दोन डोळे, एक किंवा दोन्ही हात, एक किंवा दोन्ही पाय निकामी होणे अशा प्रसंगी दोन लाखांची मदत मिळते.

यामुळे अपघातग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळतो. २०२४-२५ या आर्थिक वर्षात या योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातून एकूण १३४ प्रस्ताव आले होते. त्यापैकी ९१ जणांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. या शेतकऱ्यांना एक कोटी ८१ लाख निधी मंजूर झाला. त्यापैकी ४७ शेतकऱ्यांच्या खात्यात ९३ लाखांची मदत जमा करण्यात आली आहे.

यांना मिळणार लाभ

राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी, वहितीधारक नसलेल्या शेतकरी कुटुंबातील कोणताही एक सदस्य (आई-वडील, शेतकऱ्याची पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही व्यक्ती) यापैकी १० ते ७५ वर्षे वयोगटातील एकूण दोन जणांकरिता ही योजना राबविण्यात येते.

गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबांनी लाभ घ्यावा. जिल्ह्यात २०२४-२५ या आर्थिक वर्षात ४७ शेतकऱ्यांना ९३ लाखांची मदत देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपघातग्रस्त कुटुंबीयांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
- वंदना शिंदे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan Installment Date : पीएम किसानच्या हप्त्याची प्रतिक्षा कायम; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

Agrowon Podcast: उडदाचे भाव दबावातच; बाजरीचे दर स्थिर, कोबी- मेथीचा भाव टिकून, फ्लाॅवर दर तेजीत

Maharashtra Rain: राज्यात पावसाचा जोर वाढणार; विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर अधिक राहणार

APMC SIT Investigation: नागपूर बाजार समितीच्या चौकशीसाठी एसआयटी

Cotton Farming : पूर्वहंगामी कापूस पिकाची वाढ जोमात

SCROLL FOR NEXT