Farmer Accident Scheme : शेतकरी अपघात योजनेत २५१ प्रस्ताव मंजूर

Farmer Welfare Scheme : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत २०२४-२५ मध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला एकूण ३७६ प्रस्ताव प्राप्त झाले.
Farmer Accident Insurance
Farmer Accident Insurance Agrowon
Published on
Updated on

Nanded News : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत २०२४-२५ मध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला एकूण ३७६ प्रस्ताव प्राप्त झाले. छाननीअंती यापैकी २५१ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. यात २४७ मृत्यू आणि ४ अपंगत्व असलेले प्रकरणांचा समावेश आहे.

दरम्यान, मंजूर प्रकरणांसाठी एकूण ४ कोटी ९९ लाख रुपयांची आवश्यकता होती. परंतु प्राप्त झालेल्या दोन कोटी ६३ लाख निधीतून १३२ पीडित कुटुंबाला अनुदान वाटप करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

नांदेड जिल्ह्यात २०२४-२०२५ मध्ये वेगवेगळ्या घटनेत शेतकऱ्यांचे मृत्यू झाल्याचे ३७६ प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे दाखल झाले होते. यांपैकी ४४ प्रस्ताव छाननीअंती नामंजूर करण्यात आले आहेत. तर ५२ प्रस्ताव कागदपत्रांच्या अभावामुळे प्रलंबित आहेत. २९ प्रस्ताव तालुकास्तरावरील समितीकडे मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. तर ३ प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीकडे अपिलात आहेत.

Farmer Accident Insurance
Farmer Accidents Insurance : अमरावती जिल्ह्यातील १२७ शेतकऱ्यांचा अपघातांत मृत्यू

मंजूर २५१ प्रस्तावासाठी चार कोटी ९९ लाख रुपयांची आवश्यकता होती. परंतु राज्याच्या कृषी आयुक्तालयाकडून दोन कोटी ६३ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यामधून १३१ मृत्यू प्रकरणे आणि १ अपंगत्व प्रकरण अशा १३२ प्रस्तावांना दोन कोटी ६३ लाखांचा निधी वितरित करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. तथापि, अद्याप निधीअभावी ११६ मृत्यू व ३ अपंगत्व अशा एकूण ११९ प्रस्ताव प्रलंबित आहेत. यासाठी २ } कोटी ३६ लाख रुपयांचा अतिरिक्त निधी अपेक्षित असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातून देण्यात आली आहे.

Farmer Accident Insurance
Farmer Accident Insurance : अपघात विम्यापासून शेतकरी वंचित

शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी या हेतूने राबविण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत अनेकांना दिलासा मिळाला असला तरी सुमारे ११९ प्रस्ताव निधीअभावी रखडलेले आहेत. लवकरच आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. यामुळे या योजनेचा उद्देश पूर्णत्वास जाईल आणि शेतकरी कुटुंबांना आवश्यक ती मदत वेळेत मिळू शकेल.

अपघाती मृत्यूच्या पात्र बाबी

शेतात काम करताना अपघात होणे

बोअरवेल, विहिरीत पडणे किंवा पाणी उपसताना अपघात होणे

विषारी जनावरांच्या (साप, बिचू, डास इ.) चाव्याने मृत्यू

वीज पडून किंवा विजेचा झटका लागून मृत्यू

प्राकृतिक आपत्तीमुळे (वादळ, पुर, भूकंप) मृत्यू

जंगली प्राण्यांच्या हल्ल्‌यात मृत्यू

कृषी यंत्राचा वापर करताना अपघात होणे

वाहन अपघात (शेताशी संबंधित प्रवासादरम्यान)

कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा होऊन मृत्यू

विहिरीतील गॅस, ऑक्सिजनअभावी मृत्यू

मधमाश्या किंवा तत्सम कीटकांच्या हल्ल्‌यामुळे मृत्यू

जमिनीचा भुसभुशीतपणा किंवा धसका बसून पडणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com