Monsoon Rain Agrowon
ॲग्रो विशेष

September Monsoon Rain : सप्टेंबरच्या पावसाने दिलासा

Maharashtra Monsoon Rain : मॉन्सून हंगामात सप्टेंबरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्याला चांगला आधार मिळाला आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : मॉन्सून हंगामात सप्टेंबरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्याला चांगला आधार मिळाला आहे. तीन तालुक्यांत सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. इतर तालुक्यांत शंभर टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात हंगामात सरासरीच्या ८६१.६ मिलिमीटरपैकी ६५६.९ मिलिमीटर म्हणजेच ७६.२ टक्के पाऊस पडल्याची नोंद कृषी विभागाकडे झाली आहे.

मागील चार महिन्यांतील पावसाची परिस्थिती पाहता, ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील पहिले पंधरा दिवस असा तब्बल दीड महिना खंड पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील काही तालुक्यांत पाणीटंचाईची समस्या गंभीर झाली होती. मात्र सप्टेंबरमधील शेवटच्या पंधरा दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाने पुण्यासह दुसऱ्या राज्याला संजीवनी दिली.

सप्टेंबरच्या आठवड्यापर्यंत निम्मा जिल्हा कोरडा होता. आठ ते दहा दिवस झालेल्या मुसळधार पावसाने सर्व तालुक्यांतील पाणी टंचाई दूर केली. सप्टेंबरमध्ये सर्व तालुक्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. तर केवळ बारामतीमध्ये सरासरी ८० टक्के पाऊस झाला. तर काही तालुक्यांना समाधान सप्टेंबरमध्ये पुणे जिल्ह्याला पावसाने मागील तीन महिन्यांतील बॅकलॉग भरून काढत सरासरीमध्ये वाढ केली.

मात्र आता परतीचा पाऊसही फारसा न झाल्यामुळे राहिलेला बॅकलॉग कसा भरणार, असा प्रश्‍न उपस्थित झाला. यंदाच्या पावसाळी हंगामात (१ जून ते ८ ऑक्टोबरपर्यंत) आंबेगाव, भोर, मावळ तालुक्यांत सरासरीपेक्षा शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला.

वेल्हे, जुन्नर, खेड - राजगुरुनगर येथे ८५ टक्क्यांपेक्षा अधिक, तर पुणे शहर, हवेली, शिरूर, इंदापूर, दौंड तालुक्यांत ६० टक्क्यांपेक्षा अधिक आणि अन्य तालुक्यांत ५० टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.

जिल्ह्यात तालुकानिहाय पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये : (स्रोत ः कृषी विभाग)

तालुका -- सरासरी पाऊस --- पडलेला पाऊस -- टक्के

पुणे शहर -- ६०५.५ -- ४२२.१ -- ६९.७

हवेली -- ७०८.८ -- ३८७.२ -- ५४.६

मुळशी -- १५७३.२ -- १२२२.२ -- ७७

भोर -- ९८८.२ -- १०२१.० -- १०३.३

मावळ -- ११८०.९ -- १७३०.२ -- १४६.५

वेल्हे -- २३९८.१ -- २१.४०.३ -- ८९.२

जुन्नर -- ५९४.२ -- ५२५.२ -- ९५

खेड -- ५५३.० -- ५२५.२ -- ९५

आंबेगाव -- ६९०.५ -- ८५९.५ -- १२४

शिरूर --- ३८६.१ -- २९५.८ --७६

बारामती -- ३८९.२ -- २२९.५ --५९

इंदापूर -- ४२७.० -- २९९.७ --७०

दौंड -- ४६५.६ -- २८६.८ -- ८०

पुरंदर -- ४६५.८ -- २६८.४ -- ५७

पुणे -- ८६१.६ -- ६५६.९ --- ७६.२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सरकीचा भाव तेजीत; कापूस टिकून, सोयाबीनमध्ये चढ उतार, खरबूजाला उठाव तर टोमॅटो आवक टिकून

Orchards Rain Damages: पावसाचा फळबागांचा फटका

khandesh Water Storage: मध्यम, लघु प्रकल्पांत जलसाठा ५० टक्क्यांपर्यंत

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

SCROLL FOR NEXT