Heavy rains : पितापूर परिसरात मुसळधारेने पिकांना फटका

Solapur flood : परतीच्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शेतात पाणी साचल्याने अवघ्या १०-१२ दिवसांत काढणीला आलेले सोयाबीन व उडदाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Heavy rains
Heavy rainsAgrowon
Published on
Updated on

Solapur News : अक्कलकोट तालुक्यातील पितापूरमध्ये रविवारी (ता. १) मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचल्याने अवघ्या १०-१२ दिवसांत काढणीला आलेले सोयाबीन व उडदाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रविवारी मध्यरात्री मुसळधार झालेल्या पावसामुळे हरणा नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

Heavy rains
Marathwada Heavy Rain : मराठवाड्यातील ३९ मंडलांमध्ये अतिवृष्टी

पितापूरसह, नन्हेगाव, आकतनाळ, बोरेगाव, हन्नूर व चपळगाव परिसरांतील अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या शेतात गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पितापूर गावातील महबूब सगरी, लाडलेसाब सगरी, दिलीप व्हनमाने, भुताळी व्हनमाने, लिंबाजी व्हनमाने यांच्या शेतातील सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच यापैकी पीकविमा काढलेल्या अनेक शेतकऱ्यांनी नुकसानीबाबत विमा कंपनीला माहिती दिली. पण तिकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. कृषी आणि महसूल विभागाने या नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

आम्ही कृषी विभागाने सांगितल्याप्रमाणे अतिवृष्टीच्या नुकसानीमुळे तातडीने विमा कंपनीला फोन करून कळविले. परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. पुन्हा वेळेत तक्रार न दिल्याने आमचे नुकसान होणार आहे. त्यामुळे तातडीने कृषी आणि महसूल विभागाने नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ भरपाई द्यावी.
- दिलीप व्हनमाने, शेतकरी, पितापूर, ता. अक्कलकोट

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com