Ethanol production Agrowon
ॲग्रो विशेष

Ethanol Production : इथेनॉल उत्पादकांसाठी लवकरच गुड न्यूज

Ethanol producers : तेल मंत्रालयाचा दरवाढीच्या प्रस्तावाला मंजुरीची शक्यता

Team Agrowon

राजकुमार चौगुले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : कोल्हापूर : इथेनॉल उत्पादकांसाठी लवकरच गुड न्यूज मिळण्याची शक्यता आहे. तेल मंत्रालयाने यंदाच्या इथेनॉल वर्षासाठी इथेनॉलच्या किमती वाढविण्याचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी कॅबिनेटकडे पाठविला आहे. लवकरच या बाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. केंद्रीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इथेनॉलच्या किमतीत चार ते पाच रुपयांनी वाढ होऊ शकते.

अन्न मंत्रालय आणि तेल विपणन कंपन्या यांच्याशी चर्चा केल्यानंतर इथेनॉलच्या किमती वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अन्न मंत्रालयाने यापूर्वी इथेनॉल पुरवठा वर्षासाठी इथेनॉलच्या किमती वाढविण्याची शिफारस केली होती. या प्रस्तावित वाढीचा उद्देश इथेनॉल उत्पादक आणि डिस्टिलरीजना भारताच्या इथेनॉल मिश्रणाच्या लक्ष्यानुसार उत्पादन वाढविण्यासाठी प्रोत्साहन देणे हा आहे.

गेल्या वर्षी कमी साखर उत्पादनाचे कारण देत केंद्राने इथेनॉल निर्मितीला ब्रेक लावला. यामुळे इथेनॉल निर्मिती रखडली. दरात ही समाधानकारक वाढ नसल्याने इथेनॉल उत्पादकाकडून गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने किमती वाढविण्याबाबत केंद्राकडे आग्रह धरण्यात येत होता. याचा विचार करून किमती वाढविण्याबाबत हालचालींनी वेग घेतला आहे.

इथेनॉलची उत्पादन क्षमता वाढ गरजेची

भारताला पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉलचे मिश्रण साध्य करण्यासाठी, १,०१६ कोटी लिटर इथेनॉलची आवश्यकता आहे. एकूण इथेनॉलची मागणी सुमारे १,३५० कोटी लिटर आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी, ८० टक्के प्रकल्पांची कार्यक्षमता गृहीत धरून २०२५ पर्यंत १७०० कोटी लिटर इथेनॉल उत्पादन क्षमता निर्माण करणे आवश्यक आहे.

...अशी आहे यंदाची स्थिती

- यंदाच्या इथेनॉल वर्षासाठी (२०२४-२५) तेल कंपन्यांनी इथेनॉल उत्पादकांकडून ९७० कोटी लिटरची मागणी.

- हंगामासाठी ९१६ कोटी लिटरची गरज.

- इथेनॉलची गरजेपेक्षा ६ टक्के जादा मागणी.

- ९७० कोटींपैकी ३९१ कोटी लिटर इथेनॉलची मागणी उसावर आधारित.

- धान्यापासून बनवलेल्या इथेनॉलची मागणी ५७९ कोटी लिटर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement Center : कोरेगावात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू

Sugarcane Farming : शाहूवाडी परिसरात खुंटली आडसाली उसाची वाढ

Dairy Farming : दुग्ध व्यवसाय प्रत्येक शेतकऱ्याचा मोठा आधार

Water Crisis : ‘मोरणे’चे पात्र पडू लागले कोरडे

Achalpur APMC : अचलपूर बाजार समिती देणार व्यापाऱ्यांना ओळखपत्र

SCROLL FOR NEXT