Gondia water  Agrowon
ॲग्रो विशेष

Gondia water : गोंदिया जिल्ह्यात पाणीटंचाई नाही: चौबे

Gondia water reservoir : गोंदिया जिल्ह्यात सरासरी ५४ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने सध्यातरी पाणीटंचाईची नाही.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : मागील वर्षी राज्याच्या अनेक भागात सरासरीपेक्षा कमी प्रमाणात पाऊस पडला आहे. त्यामुळे बहुतांश भागात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली. तसेच राज्यातील अनेक प्रकल्पांमध्ये खूप कमी प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. मराठवाड्यात तर मोठ्या धरणांमध्ये केवळ ३६ टक्के पाणीसाठा शिल्लक असून येथे ३१९ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यादरम्यान विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात सुदैवाने सध्यातरी पाणीटंचाई दिसून आलेली नाही. तरीही वाढती उष्णता आणि इतर जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती पाहता पाण्याच्या योग्य नियोजनाकडे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने लक्ष घातले आहे.

राज्यातील अनेक धरणातील पाणीसाठ्याने मार्चच्या सुरूवातीलाच तळ गाठण्यास सुरूवात केली आहे. अजूनही उन्हाळा बाकी असून पावसाळ्याला तीन महिने शिल्लक आहेत. दरम्यान अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे.

मात्र गोंदिया जिल्ह्यात सध्यातरी हवामान थंड असून उष्णता वाढलेली नाही. तर येथील प्रमुख तीन धरणात पाण्याचा साठा हा ५० टक्क्यांहून अधिक असून जिल्ह्याचा विचार केल्यास सरासरी ५४ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती गोंदिया जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी दिली आहे.

सध्या गोंदिया जिल्ह्यामध्ये सरासरी ५४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख धरणांपैकी पुजारीटोला धरणामध्ये ६० टक्के, शिरपूर धरणामध्ये ५३ टक्के तर इटियाडोह धरणामध्ये ५८ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याचेही माहिती चौबे यांनी दिली आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवत आहे. मात्र सुदैवाने गोंदियात सध्या पाण्याची टंचाई दिसून आलेली नाही. मात्र येणाऱ्या दिवसात परिस्थिती कशी निर्माण होईल हे सांगता येत नाही. यामुळे गोंदिया जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आधिच अलर्टमोडवर असून पाण्याच्या योग्य नियोजनाकडे लक्ष दिले जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Urea Shortage : युरियाचा कमी वापर करा, ८०० रुपये मिळवा, आंध्र प्रदेशला असा निर्णय का घ्यावा लागला?

Village Rehabilitation: मसाळा गावातील केवळ २८८ घरांचेच पुनर्वसन शक्य 

AI in Agriculture: कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे माती, पिकांची आरोग्य तपासणी

Panand Road: परभणी जिल्ह्यात आजपासून शेत रस्ते विषयक मोहीम

Interview with Pasha Patel: पृथ्वी व मानवजातीच्या शाश्वत विकासाचा मार्ग

SCROLL FOR NEXT