Gold Market Rate
Gold Market Rate  Agrowon
ॲग्रो विशेष

Todays Gold Rate : सोन्याच्या दरात वाढ सुरूच; चांदीत किंचित घट

Team Agrowon

Jalgaon News : सोने व चांदीच्या दरात सरत्या महिन्याच्या अखेरीस आणखी वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ६० हजार ३७० (जीएसटीसह) रुपये प्रतितोळापर्यंत असून, चांदीचे दर प्रतिकिलो ७६ हजार ९०० रुपये (जीएसटीसह) असे आहेत.

ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या दहा दिवसांत सोन्यासह-चांदीच्या दरात चढउतार दिसून आला. काही दिवस दरात किंचित घट नोंदविण्यात आली. परंतु २१ ऑगस्टपासून सोने व चांदीच्या दरात वाढीचाच कल दिसला. ऑगस्टच्या शेवटच्या टप्प्यात सोने एक तोळ्यामागे ८०० रुपयांनी वधारले तर चांदी दरात एका किलोमागे सुमारे चार हजार रुपयांची वाढ झाली आहे. या महिन्यात गेल्या दोन दिवसांत सोने-चांदीचे दर कमीअधिक होताना दिसले.

१ सप्टेंबर रोजी सोने व चांदी दरात किंचित घसरण झाली. पण २ सप्टेंबर रोजी सोने वधारले. पण चांदी दरात मात्र घसरण दिसून आली. पुढे सणासुदीचे दिवस आहेत. तसेच मागणीदेखील आहे. यामुळे सोने-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ दिसेल, असेही जाणकारांचे मत आहे.

२९ ऑगस्ट रोजी सोने दरात एक तोळ्यामागे २५० रुपयांची वाढ झाली. ३० ऑगस्ट रोजी सोन्यात ३०० रुपयांची वाढ झाली. ३१ ऑगस्ट रोजी सोने दरात आणखी १६० रुपयांनी वाढ झाल्याचे दिसून आले. १ सप्टेंबरला सोने दरात किंचित घसरण झाली. २ सप्टेंबरला सोने दरात एक तोळ्यामागे १५० रुपयांची वाढ झाली. २२ कॅरेट सोने दर ५५ हजार ३५० रुपये प्रतितोळा, २४ कॅरेट सोन्याचा दर ६० हजार ३७० रुपये प्रतितोळा आहे.

चांदी दर ७६ हजार ९०० रुपये

या महिन्यात चांदी दरात किलोमागे ७०० रुपयांची घसरण झाली. १ सप्टेंबर रोजी चांदीत एक किलोमागे ५०० रुपयांची तर २ सप्टेंबर रोजी २०० रुपयांची घसरण झाली. ऑगस्टमध्ये १६ ऑगस्टनंतर चांदी दरात सतत वाढ झाली होती. ऑगस्टमध्ये चांदी दरात एक किलोमागे एकूण चार हजार रुपयांची वाढ नोंदविण्यात आली. आता एक किलो चांदीचा दर ७६ हजार ९०० रुपये आहे. सोने-चांदी दरात वाढ झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parliament Session 2024 : शेतमालाच्या हमीभाव कायद्यावरून संसदेत गोंधळ; राहुल गांधी आणि कृषिमंत्र्यांमध्ये खडाजंगी

Animal Care : जनावरांचे आरोग्य, आहार व्यवस्थापन

Organic Paddy Farming : सेंद्रिय भातशेतीसह देशी गोपालन, कुक्कुटपालन

Kolhapur Rain : शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडामध्ये मुसळधार, राजाराम बंधाऱ्याच्या पाणी पातळीत १ फुटाने वाढ

Vegetable Farming : प्रत्येकी ३० गुंठे भाजीपाला उत्पादनातून मिळविले स्थैर्य

SCROLL FOR NEXT