Gokul Milk Rate agrowon
ॲग्रो विशेष

Gokul Milk Rate : ‘गोकुळ’चा गायीचा दूध खरेदी दर सर्वाधिक

Team Agrowon

Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) चा गायीच्या दुधाचा खरेदी दर आजही सर्वाधिक आहे, असा दावा संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी केला आहे. डोंगळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, ‘गोकुळ’मार्फत सेवा-सुविधा इतरांपेक्षा जास्त दिल्या जातात. काही महिन्यांपासून गाईच्या दूध उत्पादनात वाढ होत आहे.

कोरोनानंतर गाय, म्हशीच्या दुधाला चांगली मागणी होती. त्यामुळे उत्पादकांना चांगला दर देता आला. त्याबरोबरच बटर व दूध पावडरीचे दरही वाढले होते. परिणामी गेल्या दोन वर्षांत प्रतिलिटर १० ते ११ रुपयांची दूध दरवाढ करण्यात आली. यामुळे गाय खरेदीवर दूध उत्पादकांनी भर दिला.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दोन महिन्यांत बाजारपेठेतील दूध पावडर, लोणी यांचे दर कमी झाले आहेत. फेब्रुवारी २०२३ मध्ये गायीच्या लोण्याचा दर प्रतिकिलो ४५० रुपये होता. तो सध्या ३५० रुपये प्रतिकिलो आहे. फेब्रुवारीत भुकटीचा दर २८० रुपये प्रतिकिलो होता.

तो आता २४० रुपये किलो आहे. सरासरी लोणी व भुकटीचे दर प्रतिकिलो ५० ते १०० रुपयांनी कमी झाले. त्यामुळे ‘गोकुळ’सह सर्वच संघांनी गायीच्या दूध खरेदी दरात कपात केली. सध्या प्रतिलिटर ३१ ते ३३ रुपये दर दिला जात आहे. मात्र, काही ठिकाणी आंदोलने झाली. या पार्श्वभूमीवर दर कपातीबाबतची खरी परिस्थिती उत्पादकांनी जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे.

‘गोकुळ’ने नेहमीच दूध उत्पादकांचा विचार केला आहे. तेच संघाचे मालक आहेत. दर कमी करण्याचा निर्णय नाइलाजास्तव घेतला. कारण कोणतीही संस्था ही ताळेबंदावर अवलंबून असते. दुग्धव्यवसायाच्या बाजारपेठेचा अभ्यास करून, चर्चा व विचार करून धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT