Godrej Milk Loan  Agrowon
ॲग्रो विशेष

Godrej Milk Loan : गोदरेज कॅपिटल महाराष्ट्रातील दूध उत्पादकांना देणार कर्ज!

महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यातील दूध उत्पादकांना गोदरेज कर्ज उपलब्ध करून देणार आहे.

Dhananjay Sanap

लहान दूध उत्पादक शेतकऱ्यांना गोदरेज कॅपिटलने क्रीमलाईन डेअरी आणि द्वारा ई डेअरीच्या भागीदारीनं कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यातील दूध उत्पादकांना गोदरेज कर्ज उपलब्ध करून देणार आहे. जनावरांची खरेदी आणि देखभाल करण्यासाठी गोदरेज विनातारण कर्ज उपलब्ध करून देणार आहे.

कर्ज मंजूरी जलद व्हावी तसेच कर्ज परतफेड करताना दोन वर्षांचा कालावधी देण्यात येणार आहे, अशी माहिती गोदरेजचे व्यवस्थापकीय संचालक मनीष शाह यांनी दिली आहे. दूध उत्पादकांना कर्जाचा फायदा होईल, दूध उत्पादनात वाढ होईल, असाही दावा गोदरेजने केला आहे.

मनीष शाह म्हणाले, "कृष्णागिरी जिल्ह्यात कर्ज वाटप करण्यात आलं आहे. आमचं लक्ष तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील दुग्धव्यवसायाला जोडण्यावर आहे," असंही शाह म्हणाले. क्रीमलाईन दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती करणारी गोदरेज अॅग्रोव्हेटची उपकंपनी आहे. गोदरेज जर्सी या ब्रॅंड अंतर्गत दुग्धजन्य पदार्थांची विक्री करते. कृषी अर्थव्यवस्थेमध्ये दुग्धजन्य व्यवसायाचा योगदान महत्त्वपूर्ण आहे. देशातील ८० दशलक्ष दूध उत्पादकांची रोजीरोटी दुग्धव्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे गुणवत्तापूर्ण पशुखाद्याची गरज आहे.

गोदरेज जर्सीचेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूपेंद्र सूरी म्हणाले, "आम्ही दूध उत्पादक शेतकऱ्यांसोबत एकत्र येऊन काम करणार आहोत. कर्जामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना पशूखाद्य आणि शेती कामात हातभार लागेल. त्यातून पशुधनाची संख्या वाढेल आणि उत्पादकता वाढण्यासही मदत होईल." असंही सूरी म्हणाले. गोदरेज कॅपिटल दूध व्यवसायात विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे दक्षिणेकडील राज्यांतील दूध उत्पादकांवर लक्षकेंद्रित करण्यात आलं आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Plantation Machine: आजऱ्यात होणार यंत्राद्वारे भातलागण

Onion Harvesting Delay: खानदेशात कांदा काढणी रखडली

Fish Industry Development: माफसू साकारणार ‘मत्स्य तंत्रज्ञान संकुल’

Sugarcane FPR Delay: सोलापुरात २७६ कोटी एफआरपी थकीत; कारखानदारांकडून दिशाभूल

Nashik District Bank: नाशिक जिल्हा बॅंकेला ७५३ कोटींचे भागभांडवल

SCROLL FOR NEXT