आनंद घेत घेत आपण मोठे होतो. पुढे आईने तिच्या लुगड्यापासून अतीव मायेने शिवलेल्या गोधडीत (Godhadi) प्रत्येक हिवाळ्यातला उबदारपणा आपण अनुभवत असतो. बालपणी पाळण्यात पुरेल एवढी आपल्या आकाराप्रमाणे शिवलेली गोधडी त्यावर रंगीत कापडाच्या कापण्या, पट्टीने काढलेली सुंदर नक्षी आणि मध्यभागी आपले नाव. ऋतू कोणताही असो झोपलेल्या बाळावर आईचा पहारा असतो. बाळाच्या अंगावरून सरकलेली गोधडी क्षणाचाही विलंब न लावता आई तत्परतेने सावरत असते. आपण मोठे होत जाऊ तसतसा गोधडीचा आकार मोठा होत जातो.
हातातल्या सुईदोऱ्याने अनेक आठवणींना एकत्र करून त्यांना असंख्य धाग्यात गुंफून आई गोधडी शिवत असते. दिवसभराच्या श्रमाचा थकवा बिछान्यावरची गोधडी पांघरली, की क्षणात नाहीसा होतो. गोधडी आपल्याला वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. जे गोड रंगीत स्वप्नांनी बहरलेले विश्व असते. गोधडीवरचे नक्षीकाम आणि त्यावरच्या आपल्या नावाचाही आकार मोठा होत जातो. गाठोड्यात जपून ठेवलेल्या चिंध्या कलाकुसरीने जुळवून घेत, आतल्या बाजूने आईच्या एकावर एक अंथरलेल्या फाटक्या सुती लुगड्यांचा उबदार थर, त्याच्या जोडीला वरून आणि खालून बापाच्या मांजरपाटाच्या धोतराच्या अस्तराचा भक्कम आधार म्हणजे गोधडीत असणारा भावनिक जिवंतपणा अन्य कुठल्याही पांघरुणात नाही.
एव्हाना आईच्या वेड्या मायेला शिस्त लागलेली असते. ज्या मायेने रात्री बाळाच्या अंगावर गोधडीचे पांघरून आईने घातलेले असते, सकाळी ते पांघरून बाजूला करताना ‘बाळा ऊठ शाळेत जायला उशीर होतोय’ असे म्हणत, लेकराला साखर झोपेतून जागे करताना आईला किती त्रास होत असेल कल्पना करा. आईने गोधडी बाजूला केल्यावर अचानक थंडी वाजू लागते, बाळ वैतागून जागे होते आणि ‘आई थोडेसे झोपू दे ना’ अशी विनंती करून पुन्हा अंगावर गोधडी ओढू लागते. मनावर दगड ठेवून आईला त्या वेळी कठोर व्हावे लागते. लटक्या रागाने ओरडून पुन्हा गोधडी बाजूला केली जाते, कारण तिला तिच्या बाळाचे भविष्य घडवायचे असते. गोधडी आपली संस्कृती आहे. ती जपायला हवी. आधुनिक युगातही गोधडीची ऊब सर्वांनाच हवी आहे. ग्रामीण भागात महिला बचत गटाच्या माध्यमातून गोधडी शिवण्याचा स्वागतार्ह उपक्रम काही महिला करीत आहेत. आपल्याकडे शिवलेल्या मॉडर्न गोधड्यांना परदेशात पसंती मिळत आहे. ग्रामीण भागातील महिलांना गोधडी शिवण्याच्या उपक्रमातून चांगल्या रोजगाराची संधी आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.