Akola News: अकोट येथील स्थानिक बाजारात कापसाचा दर गेल्या आठवड्यापासून सातत्याने वाढत असून, सध्या तो ९ हजार रुपयांजवळ पोहोचला आहे. सोमवारी स्थानिक बाजारात कापसाची कमाल किंमत ८,८०० रुपये नोंदवली गेली, तर मंगळवारी (ता.१३) कापूस बाजाराची सुरवात ८५८५ रुपये क्विंटलने झाली..पुढील काही दिवस हा दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे हा दरवाढ कल कृत्रिमरीत्या तयार केला गेल्याचे कापूस ब्रोकर्स बोलत असून तो किती काळ टिकेल, याविषयी ते साशंकता व्यक्त करत आहेत..Cotton Rate: कापूसदरात आशादायक उसळी.मागणीत वाढ, पुरवठ्यातील तुटवडा, सरकारी नियंत्रणातील खरेदी आणि रुई व सरकीच्या दरातील सुधारणा ही कापसाच्या दरवाढीमागे असणारी मुख्य कारणे असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून भाव सतत वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. विशेषतः ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत कापसाची विक्री केलेली नव्हती, त्यांना या वाढीव दरांचा फायदा होत आहे..स्थानिक व्यापाऱ्यांच्या मते, याआधी सीसीआय (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) खरेदीमुळे बाजारात दरांवर नियंत्रण राहिले होते. मात्र, मागणीत झालेल्या वाढीमुळे खुल्या बाजारात दर वाढीचा कल दिसून येत आहे. आता शेतकऱ्यांचा ‘सीसीआय’ला कापूस देण्याकडे कल कमी होत असून, सीसीआय केंद्रावर पुरवठा मर्यादित होऊ लागला आहे. यामुळे भाव स्थिर राहण्याऐवजी सातत्याने वाढत आहेत..Cotton Rate: कापूस भावाची वाटचाल ९ हजारांच्या दिशेने सुरु.या वाढीमुळे स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. अकोट बाजार समितीत झालेल्या खरेदी व्यवहारांत सोमवारी कापसाला कमाल ८,८०० रुपयांपर्यंत दर मिळाले. आगामी दिवसांत भाव ९ हजारांच्या आसपास किंवा त्याहून अधिक होण्याची शक्यता आहे..येत्या हंगामात चीन व ब्राझीलमध्ये लागवड कमी होईल, असा अंदाज आहे. त्यातून भारतीय बाजारपेठेवर हा परिणाम दिसून येत आहे. ही दरवाढ किती वेळ टिकेल, हे सांगता येत नाही. परंतु, तिच्याकडे शेतकऱ्यांनी विक्रीसाठी संधी म्हणून पहावे.अनिल थानवी, कॉटन ब्रोकर्स अकोला.शेतकऱ्यांना सुरुवातीला आधारभूत किमतीने तारले. आता बाजारात तेजी दिसत आहे. खुल्या बाजारामध्ये कापूस ८३०० ते ८८०० ने जात आहे. ही तेजी कायम राहिल्यास शेतकऱ्यांना खूप आधार मिळेल.अनुप साबळे, कापूस उत्पादक, तरोडा, ता. अकोट, जि. अकोला.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.