Pune News: राज्यात भ्रष्टाचारविरोधातील कारवाईत घट झाल्याचे चित्र अधिकृत आकडेवारीत दिसत असले, तरी पुणे शहर व जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील लाचखोरीचे वास्तव बदललेले नाही, हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) २०२५ मधील कारवाईतून स्पष्ट झाले आहे. सर्वाधिक लाचखोरीच्या प्रकरणांबाबतचा बदलौकिक महसूल विभागाने यंदाही कायम ठेवला असून १६८ लाचसापळ्यांत २४८ कर्मचारी ‘एसीबी’च्या जाळ्यात अडकले आहेत. त्याखालोखाल पोलिसांचा क्रमांक लागला आहे..‘एसीबी’ने १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत राज्यभरात ६८२ लाचसापळे रचले. या कारवाईत तब्बल १००९ शासकीय अधिकारी व कर्मचारी लाच घेताना जाळ्यात सापडले असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय, अपसंपदा आणि अन्य भ्रष्टाचारप्रकरणी १३ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामध्ये २१ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे वर्षभरात एसीबीच्या कारवाईत अटक झालेल्या आरोपींचा एकूण आकडा हजाराच्या पुढे गेला आहे..Revenue Department: महसूल विभागासाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारा.या कारवाईत लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये महसूल, भूमी अभिलेख व नोंदणी विभाग अव्वल ठरला असून त्यापाठोपाठ पोलिस विभागाचा क्रमांक लागतो. मागील वर्षी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ६८३ लाचसापळे रचून १००२ आरोपींना अटक केली होती. यंदा सापळ्यांची संख्या एकने कमी दाखवण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात ६६९ गुन्हे दाखल झाले असून, त्यामध्ये ९८८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. अपसंपदेसंबंधी ९ गुन्हे दाखल होऊन १७ आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर अन्य भ्रष्टाचारप्रकरणी ४ गुन्हे दाखल होऊन ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे..राज्यात नाशिक परिक्षेत्र लाचखोरीविरोधातील कारवाईत अव्वल ठरले असून, तेथे वर्षभरात १३८ लाचसापळे यशस्वी ठरले आहेत आणि त्यामध्ये २१० आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुणे परिक्षेत्रात १२४ सापळ्यांमध्ये १८१ आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुंबई परिक्षेत्रात सर्वांत कमी म्हणजे ४२ सापळे लावण्यात आले असून, त्यातून ६६ जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबईत अपसंपदेसंबंधी दोन गुन्हे दाखल होऊन दोन आरोपींना अटक झाली आहे, तर अन्य भ्रष्टाचारप्रकरणी एक गुन्हा दाखल झाला आहे. नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रात अपसंपदा किंवा अन्य भ्रष्टाचारप्रकरणी एकही गुन्हा दाखल झालेला नाही..४१ कोटी रुपये सरकारच्या तिजोरीतलाचखोरीच्या कारवाईत महसूल, पोलिस, ग्रामविकास, महानगरपालिका, महावितरण, शिक्षण विभाग, विविध प्रादेशिक कार्यालये आणि वन विभाग आघाडीवर असल्याचेही आकडेवारीतून समोर आले आहे. लाचसापळ्यांमधून दाखल झालेल्या ६६९ प्रकरणांतून ३ कोटी ५४ लाख ४९ हजार ६९५ रुपये जप्त करण्यात आले आहेत, तर अपसंपदेसंबंधी ९ प्रकरणांतून ३७ कोटी ७८ लाख २ हजार ४४१ रुपये जप्त करण्यात आले आहेत. अशा प्रकारे लाचखोरीविरोधातील कारवाईतून एकूण ४१ कोटी ३२ लाख ५२ हजार १३६ रुपये सरकारच्या तिजोरीत जमा झाले आहेत..Revenue Service: महसूल सेवा आता व्हॉट्सअॅपवर.महसूल विभागाचा लेखाजोखावर्ष सापळ्यांची संख्या आरोपींची संख्या२०२५ १६८ २४८२०२४ १८० २५२२०२३ १९९ २६५२०२२ १७५ २४६२०२१ १७८ २५२२०२० १५६ २१७.लाचखोरीत अव्वल असलेले विभागविभाग एकूण प्रकरणे सापडलेल्या आरोपीची संख्यामहसूल, भूमी अभिलेख, नोंदणी १६८ २४८पोलिस १२० १७२पंचायत समिती ६९ ९८महावितरण ४६ ६०जिल्हा परिषद ३० ४४महानगरपालिका ३३ ५०वनविभाग १८ ३०शिक्षण विभाग २९ ४३कृषी विभाग ११ १४सार्वजनिक आरोग्य १६ २३.विभागनिहाय असलेली लाचखोरीची प्रकरणेविभाग गुन्हे आरोपीमुंबई ४२ ६५ठाणे ८३ १२५पुणे १२४ १८१नाशिक १३८ २१०नागपूर ५४ ७८अमरावती ७३ १०छत्रपती संभाजीनगर १०९ १६०नांदेड ५९ ८८.लाचलुचपत विभाग दरवर्षी कारवाई करतो. मात्र, त्यानंतर सर्व प्रकरणे थंडावतात, हे दुर्दैवी आहे. उलट गुन्ह्यात सापडलेल्या अधिकाऱ्यांना बढत्या व मलईदार खाती दिली जातात. हा भ्रष्टाचाराला संरक्षण देण्याचाच प्रकार आहे. शासनाने कायद्यात तातडीने बदल करून दोषी आढळलेल्यांना कायमस्वरूपी बडतर्फ करून त्यांची संपत्ती जप्त करत कठोर दंड आकारला पाहिजे.विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच, पुणे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.