Nagpur News: राज्यासह देशभरात मांसल कोंबडीच्या बाजारात सध्या तीव्र तेजी अनुभवली जात असून, घाऊक आणि किरकोळ दोन्ही पातळ्यांवरील दर उच्चांकावर पोहोचले आहेत. घाऊक बाजारात मांसल कोंबडीचे दर १३५ ते १४० रुपये प्रति किलोपर्यंत गेले असून, किरकोळ विक्रीत चिकनचे दर २८० ते ३०० रुपये प्रति किलोवर पोहोचल्याची माहिती पोल्ट्री व्यावसायिकांनी दिली..शहरी आणि निमशहरी भागात चिकनची मागणी सातत्याने वाढत असल्याने बाजारात उपलब्धतेवर ताण निर्माण झाला आहे. हीच परिस्थिती महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक यांसारख्या दक्षिण भारतीय राज्यांमध्येही दिसून येत आहे..Poultry Farming: शेतीसह कुक्कुटपालनातून दुहेरी आनंद.दक्षिण भारतात मांसल कोंबडीचा तुटवडा अधिक असल्याने तेथील दर महाराष्ट्रापेक्षा जास्त असल्याचे पोल्ट्री व्यापाराच्या आकडेवारीतून स्पष्ट होते. गेल्या काही वर्षांमध्ये कंपन्यांनी तीन किलोपेक्षा जास्त वजनाच्या मांसल कोंबड्यांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात केला होता. मात्र एवढ्या मोठ्या वजनाच्या पक्ष्यांना ग्राहकांची अपेक्षित मागणी मिळत नव्हती. परिणामी, पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांकडे आणि व्यापाऱ्यांकडे माल अडकून पडत होता, खर्च वाढत होता आणि दरांवर दबाव निर्माण होत होता..तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सध्या मात्र मोठ्या कंपन्यांनी धोरणात्मक बदल करत दोन ते अडीच किलो वजनाच्या ‘खाण्यायोग्य’ मांसल कोंबड्यांचा पुरवठा वाढवला आहे. हा वजनाचा वर्ग ग्राहकांना अधिक पसंत पडत असल्याने विक्रीचा वेग वाढला आहे..कमी वजनाचे पक्षी लवकर विकले जात असल्याने शेतकऱ्यांकडील साठा पटकन रिकामा होतो, रोख प्रवाह सुधारतो आणि त्यामुळे बाजारात दर टिकून राहतात. दोन ते अडीच किलो वजनाच्या कोंबड्यांमध्ये पौष्टिक घटकांचे प्रमाण अधिक चांगले राहते आणि चवही तुलनेने चांगली असते. त्यामुळे ग्राहकांची या वर्गाकडे ओढ वाढल्याचे दिसते..Desi Chicken Breeds: सुधारित देशी कोंबड्यांच्या जातींची वैशिष्ट्ये.रोज ५० कोटींची उलाढालपोल्ट्री व्यावसायिक दादा गांगुर्डे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात दररोज साडेचार ते पाच हजार टन मांसल कोंबडीची मागणी आहे. सरासरी १२५ ते १३० रुपये प्रति किलोचा घाऊक दर धरला, तरी दररोज सुमारे ५० कोटी रुपयांची उलाढाल या एका व्यवसायातून होत आहे..इनपुट मार्केटवरही परिणामदरवाढीचा परिणाम इनपुट मार्केटवरही स्पष्टपणे दिसून येतो. मांसल कोंबडीचे दर देशभरात वाढल्यामुळे एका दिवसाच्या पिल्लांच्या दरातही तीव्र वाढ झाली आहे. यापूर्वी ५२ रुपये प्रति नगाचा उच्चांक गाठलेल्या या पिल्लांचे दर आता थेट ६० रुपयांवर पोहोचले आहेत, असे पोल्ट्री व्यावसायिकांचे म्हणणे आहे..आनंद ॲग्रो, ए. व्ही. बॉयलर, वेंकीज इंडिया यांच्यासह देशातील प्रमुख कंपन्यांनी मांसल कोंबडीच्या उत्पादनात कमी वजनाच्या पक्ष्यांवर भर देण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यातील असमतोल मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. पुरवठा विक्रीयोग्य वजनात येत असल्याने बाजारात कोंबडी अडकत नाही आणि त्याचा थेट फायदा दरांना मिळत आहे. विशेषतः छोट्या आणि मध्यम पोल्ट्री उत्पादकांसाठी ही स्थिती मोठा दिलासा देणारी ठरली आहे.शुभम महाले, संचालक, अमरावती पोल्ट्री असोसिएशन.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.