Godavari River Pollution Agrowon
ॲग्रो विशेष

Godavari River Pollution : पानवेलीवरून गोदाकाठचे सरपंच आक्रमक

Godavari Environmental Crisis : दर वर्षी गोदाकाठाला पानवेलींचा विळखा पडत असून, जनतेने वारंवार तक्रारी करूनही प्रशासन त्याबाबत कार्यवाही करीत नाही. या पानवेलींमुळे आरोग्यासह अनेक गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत.

Team Agrowon

Nashik News : दर वर्षी गोदाकाठाला पानवेलींचा विळखा पडत असून, जनतेने वारंवार तक्रारी करूनही प्रशासन त्याबाबत कार्यवाही करीत नाही. या पानवेलींमुळे आरोग्यासह अनेक गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे आता प्रशासनाच्या उदासीन भूमिकेविरोधात गोदाकाठच्या सरपंचांनी आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत प्रशासनाला अल्टिमेटम दिला आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्याशी चर्चा करीत तातडीने पानवेली न काढल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दशक्रिया विधी करण्याचा इशारा दिला. गोदाकाठ परिसरातील सरपंचांच्या शिष्टमंडळाचे समन्वयक चांदोरीचे सरपंच विनायक खरात, करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके पाटील, भूषण मटकरी यांनी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्यासमोर गोदावरी नदीत वाढलेल्या पानवेली समस्या मांडत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली.

गोदाकाठच्या इतर गावांच्या सरपंचांनीही पानवेलींची भीषण परिस्थिती विशद केली. वाघ यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाणवेलींचा गंभीर प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यातील पक्षांचा अधिवास धोक्यात आला असून पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातूनही अशुद्ध पाणीपुरवठा होण्याची भीती व्यक्त केली. गोदाकाठच्या १६ गावांचे ग्रामसभेचे ठराव श्री. वाघ यांना देण्यात आले.

सरपंच शिष्टमंडळात करंजगावचे सरपंच नंदू निरभवणे, सायखेडा सरपंच संदीप कातकाडे, शिंगवेचे माजी सरपंच भास्करबापू डेरले, ओढ्याच्या सरपंच प्रियांका पेखळे, एकलहरेचे सरपंच अरुण दुशिंग, अश्पाकभाई शेख, आपत्ती व्यवस्थापनाचे सागर गडाख, नीलेश पेखळे, प्रकाश ढेमसे, संजय शेळके, दौलत टर्ले, सोमनाथ टर्ले, संतोष टिळे उपस्थित होते.

पानवेली न हटविल्यास सर्वपक्षीय जनआंदोलन

निफाड तालुक्यातील १५ किलोमीटरचे गोदापात्र पानवेलींनी व्यापले आहे. पानवेलींमुळे दर वर्षी गोदाकाठला आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. मात्र, प्रशासन नेहमीच वेळकाढूपणा करते. त्यामुळे या पानवेली तातडीने न हटविल्यास सर्वपक्षीय जनआंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दशक्रिया विधी करण्यात येईल. प्रशासनाला ठिकाणावर आणण्यासाठी वेळप्रसंगी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येईल, असे करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके-पाटील यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ind-Us Trade Deal : अमेरिकेचा नवसाम्राज्यवाद आणि दादागिरी

National Livestock Mission : घोडे कुठे पेंड खाते?

Agristack Yojana : ‘महसूल’कडून एक लाख खातेदारांना अप्रूव्हल नाही

Papaya Farming : खानदेशात पावसानंतर पपई पीक जोमात

Bhama Askhed Dam : भामा आसखेड धरणात ५४.२५ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT