Goat Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Goat Farming : शेतकऱ्यांसाठी शेळीपालन चांगला पूरक जोडधंदा

शेळीची आणि पैदासीच्या बोकडाची निवड, शेळीचे वय ओळख, विविध जाती, आहार, प्रसूती, वांझपणा ओळख, वाहतुकीचे नियोजन तसेच करडांची काळजी याविषयी विस्तृत माहिती दिली.

Team Agrowon

Akola News : ‘‘वातावरण बदलाच्या (Climate Change) काळात शेळीपालन (Goat Farming) हा चांगला शेतीपूरक व्यवसाय बनू शकतो,’’ असे मत डॉ. गोपाल मंजुळकर यांनी व्यक्त केले.

स्थानिक कृषी विज्ञान केंद्र (Agricultural Science Center) व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेतर्फे जिल्ह्यांतर्गत पशुपालकांसाठी ‘शास्त्रोक्त शेळीपालन’ विषयावरील एकदिवसीय प्रशिक्षण गुरुवारी (ता. २) घेण्यात आले. या वेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘केव्हीके’चे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. उमेश ठाकरे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. किशोर बिडवे, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेचे डॉ. गिरीश पंचभाई, किरण दंदी, सचिन गायगोळ व संदीप गवई उपस्थित होते.

डॉ. मंजुळकर यांनी शेळीची आणि पैदासीच्या बोकडाची निवड, शेळीचे वय ओळख, विविध जाती, आहार, प्रसूती, वांझपणा ओळख, वाहतुकीचे नियोजन तसेच करडांची काळजी याविषयी विस्तृत माहिती दिली.

डॉ. बिडवे यांनी शेळीपालन व्यवसाय का निवडावा, यातील विविध संधी, खरेदीचे ठिकाण, लसीकरण, निर्जंतुकीकरण, विविध आजारांबाबत माहिती दिली. डॉ. पंचभाई यांनी जनावरांचे गोठे व्यवस्थापन या विषयांवर पशुपालकांना मार्गदर्शन केले.

डॉ. ठाकरे यांनी शास्त्रीय पद्धतीने शेळीपालन केल्यास चांगला जोडधंदा होऊ शकतो तसेच तत्सम माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्राच्या संपर्कात राहावे, असे आवाहन केले. या कार्यक्रमास जिल्ह्यातून २५० पेक्षा अधिक शेळीपालक हजर होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केव्हीकेचे उद्यानविद्या विषय विशेषज्ञ गजानन तुपकर यांनी केले. आभार गृहविज्ञान विषय विशेषज्ञ कीर्ती देशमुख यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

MIDC Long March : एमआयडीसीविरोधात वर्णे ते सातारा ‘लाँग मार्च’

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

SCROLL FOR NEXT