Soybean Rate  Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Rate : सोयाबीनला सहा हजारांचा दर द्यावा

Soybean Market : देशातील विविध राज्यांमध्ये सोयाबीनला सहा हजारांचा दर मिळावा यासाठी सोशल मीडिया वॉर सुरू झाले आहे.

Team Agrowon

Akola News : देशातील विविध राज्यांमध्ये सोयाबीनला सहा हजारांचा दर मिळावा यासाठी सोशल मीडिया वॉर सुरू झाले आहे. याचे लोण आता राज्यातही गावखेड्यात पसरू लागले आहे. जिल्ह्यातील कळंबा ग्रामपंचायतीने शनिवारी (ता. ३१) झालेल्या ग्रामसभेत सोयाबीनला सहा हजार रुपये दर मिळावा, असा ठराव संमत केला. हा ठराव शासनाकडे पाठवला जाणार आहे.

सोयाबीनला कमी दर मिळत असून आगामी हंगाम तोंडावर आलेला असताना दरवाढीची फारशी चिन्हे दिसत नाहीत. सोयाबीन सध्या बाजारात ३५०० पासून ४२०० पर्यंत विकले जात आहे. वास्तविक हमीभाव ४८९२ रुपये जाहीर झाला आहे.

मात्र, कुठल्याही बाजारात हा दरही मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. ही परिस्थिती पाहता शनिवारी तंटामुक्ती अध्यक्ष निवडीसाठी झालेल्या ग्रामसभेत कळंबा बुद्रुक ग्रामपंचायतीने सोयाबीनला सहा हजारांचा दर मिळावा, अशा मागणीचा ठराव संमत केला.

सरपंच गोपाल केशवराव उगले यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. सरकारने जाहीर केलेल्या हमीभावाविषयी सदस्यांनी चर्चा केली. केंद्राने सोयाबीनला ४८९२ रुपयांचा हमीदर जाहीर केला आहे. परंतु सोयाबीनला अवघा ३५०० रुपये दर मिळतो आहे. या वेळी उपस्थित ग्रामसभा सदस्यांनी सोयाबीनला प्रतिक्विंटल सहा हजार रुपयांचा हमीभाव देण्यात यावा, असे एकमताने ठरवले. हा ठराव सर्वसंमतीने वरिष्ठांकडे पाठवण्यावर एकमत झाले.

मागील १० वर्षांत सोयाबीनचे दर होते तेथेच आहेत. उलट या काळात बियाणे, खते कीडनाशकांचा दर तिप्पट चौपट वाढला. सोंगणीची मजुरी आज तीन ते साडेतीन हजार रुपये एकर एवढी झाली आहे. अशा परिस्थितीत सोयाबीन उत्पादकांना हे पीक परवडत नाही. या पिकाला हमीभावसुद्धा बाजारात मिळत नाही. म्हणून आम्ही ग्रामसभेने ठराव घेत शासनाकडे किमान ६ हजार रुपये प्रतिक्विंटल दराची मागणी केली आहे.
- गोपाल उगले, सरपंच, कळंबा, ता. बाळापूर, जि. अकोला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT