MP Omraje Nimbalkar Agrowon
ॲग्रो विशेष

Land Acquisition : पुरावा द्या, नाहीतर शेतकऱ्यांना मावेजा द्या

MP Omraje Nimbalkar : जमिनीचे संपादन केल्याचा पुरावा द्या, नाहीतर शेतकऱ्यांना जमिनीचा मावेजा द्यावा, अशी सूचनाही त्यांनी रेल्वेला केली.

Team Agrowon

Dharashiv News : लातूर ते कुर्डूवाडी रेल्वेमार्गाचे काही महिन्यांपूर्वी विद्युतीकरण पूर्ण झाले. या कामात विद्युतीकरणाचे खांब रेल्वे विभागाने शेतकऱ्यांच्या शेतात भूसंपादन न करता रोवले आहेत. रेल्वेने जमिनीत अतिक्रमण केल्याची तक्रार अनेक शेतकऱ्यांनी केल्यानंतर ही जमीन संपादित केल्याचा दावा रेल्वेने केला. या मुद्यावर दोन दिवसापूर्वी सोलापूर येथे झालेल्या मध्ये रेल्वे विभागाच्या बैठकीत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. जमिनीचे संपादन केल्याचा पुरावा द्या, नाहीतर शेतकऱ्यांना जमिनीचा मावेजा द्यावा, अशी सूचनाही त्यांनी रेल्वेला केली.

मध्य रेल्वे सोलापूरच्या विभागीय व्यवस्थापकांसोबत धाराशिव - तुळजापूर - सोलापूर रेल्वेमार्गाच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत लातूर ते कुर्डुवाडी हा रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणावर चर्चा झाली. लातूर - कुर्डुवाडी हा पूर्वी नॅरोगेज रेल्वेमार्ग होता. २००४ मध्ये त्याचे ब्रॉडगेज रेल्वेमार्गात रूपांत्तर झाले. काही महिन्यापूर्वी रेल्वेमार्गाचे विद्युतीकरणही झाले.

मात्र, या कामात रेल्वेने अतिक्रमण करुन विद्युतीकरणाचे खांब (पोल) रोवले आहेत. एरवी रेल्वेचे अधिकारी रेल्वेमार्गाला शेतकऱ्यांकडून शेतीची मशागत करताना नकळत काही झाले तर कारवाई करण्यास मागे पुढे पहात नाहीत. विद्युतीकरणाच्या कामात मात्र, रेल्वेने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता व त्यांची संमती न घेता खांब रोवले.

खांब रोवताना रेल्वेने ही जमीन संपादित केल्याचा दावाही छातीठोकपणे केला. याबाबत अनेक शेतकऱ्यांनी विद्युतीकरणाच्या कामात रेल्वेने केलेल्या अतिक्रमणाची तक्रार खासदार निंबाळकर यांच्याकडे केली होती. त्यावर रेल्वे विभागाने अधिकचे भूसंपादन केले आहे का व केले असल्यास त्याचा मोबदला शेतकऱ्यास द्यावा, भूसंपादन केले नसल्यास सदर जमीन रेल्वे विभागाची असल्याचा भक्कम पुरावा द्यावा, असेही अधिकाऱ्यांना सुनावले.

रेल्वेच्या बांधकाम विभागामार्फत मार्गाच्या बाजूचे रस्ते व रेल्वेस्थानकाकडे जाणारा रस्ता आदी कामे केली आहेत. ही कामे अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाली असून या कामाचा पाच वर्षांपासूनचा अहवाल व कामाची तपासणी करावी, धाराशिव रेल्वे स्टेशनचे अमृत अटल योजनेंतर्गत विकास करण्याचे काम प्रगतिपथावर असून या कामाचा उच्च दर्जा राखावा व दर महिन्याला आढावा घेण्यात येईल, असे निंबाळकर यांनी सांगितले.

धाराशिव - तुळजापूर - सोलापूर या प्रस्तावित नविन रेल्वेमार्गाचे काम प्रगतीपथावर असून ते काम तीन टप्यांत पूर्ण होणार आहे. यातील पहिल्या टप्यांत ७० टक्के जमिनीचे अधिग्रहण झाले असून ९५ टक्के भूसंपादन झाल्यानंतरच रेल्वेमार्गाचे प्रत्यक्ष काम सुरु होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगीतले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Laxman Hake: ओबीसींच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, तरीही लक्ष्मण हाके मुंबईकडे जाण्यावर ठाम

Chemical Fertilizer Efficiency: विविध उपायांद्वारे वाढवा रासायनिक खतांची कार्यक्षमता

National Common Mobility Card: एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य; महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय

Madgyal Sheep Breed: ओळख माडग्याळ मेंढीची...

Sericulture Farming: रेशीम शेतीतून अर्थकारणाला गती

SCROLL FOR NEXT