Agriculture Pump Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Electricity : शेतीपंपाच्या प्रलंबित जोडण्या मार्चअखेर पर्यंत द्या

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ५ वर्षांपेक्षा अधिक काळ एकही वीज बिल न भरलेल्या ४८८७ शेतीपंप ग्राहकांच्या (७४ कोटी थकबाकी) वीज बिल वसुलीचा आढावा घेऊन थकबाकी वसुलीच्या सूचना दिल्या.

Team Agrowon

Kolhapur Agriculture Electricity News : महावितरणकडून शेतीपंपांच्या (Agriculture Pump) प्रलंबित वीज जोडण्यांचा (Electricity Supply) प्रश्न निकाली काढण्यासाठी अग्रकम देण्यात आला आहे. त्याकरिता कृषी आकस्मिक निधीसह राज्य पातळीवर १५०० कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.

कोल्हापूर परिमंडळासाठी दिलेल्या निधीचा पुरेपूर वापर करून मार्चअखेर शेतीपंपांच्या प्रलंबित वीज जोडण्या देण्याचे काम पूर्ण करावे, अशा सूचना कार्यकारी संचालक अरविंद भादीकर यांनी आढावा बैठकीत दिल्या.

महावितरणच्या (MAhavitaran) कोल्हापूर परिमंडल कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत मुख्य अभियंता परेश भागवत, अधीक्षक अभियंता अंकुर कावळे, धर्मराज पेठकर यांच्यासह कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कार्यकारी अभियंते उपस्थित होते.

शेतीपंप प्रलंबित वीज जोडणी, कृषी आकस्मिक निधीचा वापर, वीज देयक थकबाकी वसुली, नादुरुस्त रोहित्र बदलणे, मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना, वीजहानी अधिक असलेले फीडर्स आदी विषयांच्या अनुषंगाने श्री. भादीकर यांनी सविस्तर आढावा घेतला.

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील शेतीपंपांच्या प्रलंबित वीज जोडण्याचा प्रगतीचा आढावा घेऊन ३१ मार्च २०२३ अखेर निर्धारित २०४४ वीज जोडण्यांचे लक्ष्य पूर्ण करण्याच्या सूचना श्री. भादीकर यांनी दिल्या. शेतीपंपाची नादुरुस्त रोहित्रे तातडीने बदलून देण्यात यावीत, असेही त्यांनी सांगितले.

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ५ वर्षांपेक्षा अधिक काळ एकही वीज बिल न भरलेल्या ४८८७ शेतीपंप ग्राहकांच्या (७४ कोटी थकबाकी) वीज बिल वसुलीचा आढावा घेऊन थकबाकी वसुलीच्या सूचना दिल्या.

महावितरण ग्राहकांना दैनंदिन वीज खरेदी करून पुरवठा करते. वीज बिलांच्या वसुलीतून वीज खरेदीचा खर्च भागविला जातो. तेव्हा वीज बिलांची वसुली मार्च अखेरीस शून्य करण्याचे निर्देश भादीकर यांनी दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nilanga Crop Competition Winners: निलंग्यात पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार

Farm Loan Waiver Benefits: पुढील आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

Nashik Annual Credit Plan: नाशिक जिल्ह्यासाठी ६० हजार ५७५ कोटींचा पतपुरवठा आराखडा मंजूर

Fruit Crop Insurance Scheme: फळपीक विमा योजनेच्या अर्जास प्रारंभ

NAFED Onion Procurement: कांदा खरेदीसाठी ‘नाफेड’ने जनजागृती करावी : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

SCROLL FOR NEXT