Soybean Cotton Rate
Soybean Cotton Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton, Soybean MSP : कापसाला १२ हजार रुपये तर सोयाबीनला ८ हजार रुपये हमीभाव द्या

Team Agrowon

Cotton Soybean Market Update Parbhani : कापसाला (Cotton Rate) प्रतिक्विंटल १२ हजार रुपये आणि सोयाबीनला प्रतिक्विंटल ८ हजार रुपये हमीभाव (Soybean MSP) द्यावा.सर्व शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर करावा.

हमीभावाने शेतीमाल खरेदी सुरु करावी आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे जिंतूर आणि सेलू येथील तहसील कार्यालयासमोर बुधवारी (ता. २२) धरणे आंदोलन करण्यात आले.

मागील वर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात सततचा पाऊस, अतिवृष्टी झाल्यामुळे जिंतूर तालुक्यातील पीक नुकसानीबद्दल सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करून तत्काळ वाटप करावी.

पीकविमा कंपनीला जिंतूर आणि सेलू तालुक्यातील सर्व विमाधारक शेतकऱ्यांना पीकविमा देण्यासाठी आदेशित करावे. हरभऱ्याची खरेदी हमी भावापेक्षा कमी दराने होत आहे.

त्यामुळे हमीभाव खरेदी केंद्र तत्काळ सुरु करावेत. गावांमधील घरगुती व शेतीपंपांची महावितरणकडून सक्तीची वीजबिल वसुली थांबावी.

कृषीपंपांची वीज तोडणी तत्काळ बंद करण्यासाठी आदेशित करावे आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार विजय भांबळे यांच्या नेतृत्वात बुधवारी (ता. २२) जिंतूर आणि सेलू या दोन्ही ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. पक्षाचे पदाधिकारी, शेतकरी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : विदर्भात पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज; राज्यात ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाज

Drought 2024 : देशातील प्रमुख धरणात पाणीसाठा घटला; पाणीसंकट गंभीर ?

Sludge Remove Campaign : ‘घरणी’तील गाळ उपसा मोहिमेची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

Water Scarcity : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४१२ गावांना ६७८ टॅंकर्सद्वारे पाणीपुरवठा

Parbhani city Water supply : अखेर भर उन्हाळ्यात तोडलेला वीजपुरवठा सुरळीत; परभणी शहराला पाणीपुरवठा सुरळीत

SCROLL FOR NEXT