Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Crop Damage : गिरणा परिसरास अवकाळी पावसाचा फटका

गिरणा परिसरास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपले. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले.

Team Agrowon

Jalgaon Agriculture Damage News : गिरणा परिसरास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपले. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. पावसामुळे भुईसपाट झालेल्या बाजरी, ज्वारी, मका, कांदा यांचे अतोनात नुकसान झाले असून, उत्पादनात देखील मोठी घट येण्याची शक्यता आहे.

हातातोंडाशी आलेला घास अस्मानी संकटाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे. सर्वत्र नुकसान असल्याचे चित्र परिसरात दिसत आहे.

चाळीसगावमधील मेहुणबारे परिसरात वातावरणात सकाळपासूनच प्रचंड उकाडा होता. काल रात्री साडेसातच्या सुमारास विजांचा कडकडाटासह अचानक पावसाने अक्षरशः गिरणा पट्यात झोडपून काढले.

या पावसामुळे काढणीला आलेला कांदा, मका, बाजरी, पिकांना मोठा तडाखा बसला. पावसाच्या माऱ्याने पिके जमीनदोस्त झाली. या पावसाने बाजरीचे व ज्वारीचे मोठे नुकसान झाले.

कांद्याचे प्रचंड नुकसान

गिरणा परिसरात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर झालेली होती. कांद्याला सध्या भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना कवडीमोल भावात कांदा विक्री करावा लागत आहे. अवकाळी पावसामुळे सध्या कांदा वाफ्यातच सडू लागला आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना या वर्षी कांदा साठवून ठेवणेही शक्य नाही. या वर्षी पिके काढणीच्या वेळीच पावसाने थैमान घातल्याने कांदा पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र परिसरात दिसत आहे.

कांदा झाकण्यासाठी धावपळ

कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले असून, आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. खरीप, रब्बी दोन्ही हंगामाचे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. कांदा पिकाला उत्पादन खर्च जास्त लागतो व विक्रीच्या वेळी भाव मिळत नाही.

यावर्षी भरपूर पाणी असल्याने कांदा लागवड मोठ्या प्रमाणात शेतकरीवर्गाने केली. पण अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले. त्यामुळे ५०० रुपये प्रति क्विंटलने सध्या कांदा विकावा लागत आहे. काढून ठेवलेला कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडत आहे.

कर्जमाफीची मागणी

या वर्षी अवकाळी पावसाचा फटका कापसाबरोबर सर्वच पिंकाना बसला आहे. उत्पादन कमी व खर्च जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. यामुळे शंभर टक्के उत्पन्न बुडाले आहे.

कांदा, मका, बाजरी, ज्वारीचे पीक हातचे गेल्यामुळे बळिराजा हताश झाल्याचे चित्र दिसत आहे. पावसाने शेतकरी हतबल झाला आहे. या भागातील शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून शासनाने त्यांना आधार द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. काही शेतांमध्ये आठ दिवस देखील वाफसा होणार नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT