Nashik DCC Bank Agrowon
ॲग्रो विशेष

Nashik Zilha Bank : थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्जाची हमी घेऊन कर्जमुक्त करा

NDCC Bank Update : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यात थकबाकीदार शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली सुरू केली आहे.

Team Agrowon

Nashik News : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यात थकबाकीदार शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली सुरू केली आहे. ती तत्काळ बंद करून त्या जागेवर विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे किंवा जिल्हा बँकेचे नाव लावण्याचे काम थांबविण्यात यावे.

यापूर्वी लावलेली नावे कमी करून पूर्ववत शेतकऱ्यांची नावे कब्जेदार सदरी लावण्यात यावे. शेतकऱ्यांच्या कर्जाची हमी घेऊन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, लेट खरीप कांद्याप्रमाणे उन्हाळ कांद्याला अनुदान द्या. कांदा, टॉमॅटो, द्राक्ष व इतर पिकांची नुकसानभरपाई द्या, अशा मागणीसाठी धरणे उपोषणास बसलेल्या आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला.

मात्र पोलिसांनी शिष्टमंडळाला निवेदन देण्यात पाठवले. या वेळी शेतकऱ्यांच्या कर्जाची हमी घेऊन शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करा, अशी मागणी जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे करण्यात आली आहे

शेतकरी संघटनेने १ जून रोजी गोदावरी नदीवर जावून रामकुंडावर कर्जाच्या नोटिसा बुडवून जिल्हा प्रशासनास लेखी निवेदन देऊन गोलकल्ब मैदानावर धरणे आंदोलन व उपोषण सुरू केले आहे.

शासनाने याची दखल न घेतल्याने बुधवारी (ता. १४) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार मोर्चा काढण्यात आला; मात्र पोलिस आयुक्त याचा मनाई आदेश असल्याने मोर्चा स्थगित झाला. परवानगी नाकारल्याने आंदोलक शेतकरी आक्रमक झाले होते.

शेतकरी संघटना समन्वय समितीचे भगवान बोराडे, शेतकरी संघर्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर मोगल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप खेमराज कोर, कुबेर जाधव, रामराव मोरे, दत्तात्रय सुडके, मोती पाटील पानगव्हाणे, बाजीराव शिंदे, दिलीप पाटील उपस्थित आदी होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Clean Milk Production: स्वच्छ दूध उत्पादनासाठी महत्वाचे ४ उपाय; दुधाची गुणवत्ताही सुधारण्यास होईल मदत

Farmer Protest: शेतकरी प्रश्नांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा (श.प) नाशिकमध्ये आक्रोश मोर्चा 

Banana Farming: केळी बागेत काटेकोर सिंचनासह कीड, रोग नियंत्रणावर भर

Cucumber Farming : तंत्रज्ञानाचा वापरातून काकडीचे पीक फायदेशीर

Air Pollution: जनावरांमुळे होणारे वायुप्रदूषण कमी करण्याचे उपाय

SCROLL FOR NEXT