BAIF Anniversary Agrowon
ॲग्रो विशेष

BAIF Anniversary : गुणवत्तापूर्ण दूध उत्पादनासाठी आनुवंशिक सुधार कार्यक्रम महत्त्वाचा ः डॉ. वॅरीज

Milk Production : ‘बाएफ' संस्थेचा ५८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Pune News : उरुळी कांचन, जि.पुणे ः गुणवत्तापूर्ण दूध उत्पादन वाढ आणि जातिवंत पैदाशीसाठी आनुवंशिक सुधार कार्यक्रम महत्त्वाचा आहे. तसेच पशू आहार आणि आरोग्य व्यवस्थापन करून अधिक दूध उत्पादन शक्य होईल. तसेच प्रती लिटर दूध उत्पादनामागे मिथेन उत्सर्जन कमी करणे शक्य होईल, असे मत अमेरिकेतील बिल अॅण्ड मिलिंडा गेट्स फाउंडेशनचे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी डॉ. आल्फ्रेड डी. वॅरीज यांनी मांडले.

बाएफ संस्थेचा ५८ वा वर्धापन दिन सोमवारी (ता.२६) उरुळी कांचन येथे उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आल्फ्रेड डी. वॅरीज उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. अशोक पांडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. अध्यक्ष डॉ. भरत काकडे यांनी बाएफ संस्थेच्या विविध राज्यातील कार्यक्रमांचा आढावा घेतला. याचबरोबर भविष्यकाळात राबविण्यात येणाऱ्या आणि सुरुवात केलेले महत्वाकांक्षी प्रकल्प, रूरल इनोव्हेशन पार्क, हरित ऊर्जा प्रकल्प, बायोलेदर प्रकल्प, जनावरांचा आनुवंशिक दर्जा सुधारण्यासाठी प्रयोगशाळेत आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा वापर, आधुनिक शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आणि वातावरण बदलासाठी विशेष उपक्रमांची माहिती दिली.

डॉ. वॅरीज यांनी संस्थेच्या विविध संशोधन प्रकल्पांस भेट देऊन माहिती घेतली. पशुसंवर्धन आणि पशूंच्या आनुवंशिक अभ्यासाचे कौतुक करून संस्थेसोबत विविध संशोधनात्मक कार्यामध्ये सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या हस्ते विविध राज्यांतील महिला बचत गटांना डॉ. मणिभाई देसाई गौरव पुरस्कार आणि विजयाताई देशमुख स्मृती पुरस्काराने गौरविण्यात आले.

उत्कृष्ट काम केलेले शेतकरी आणि महिलांना अरविंदभाई मफतलाल किसान मित्र आणि गोपाल सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच विशेष संशोधन केलेले संस्थेचे कर्मचारी, गुणवंत कामगार, विविध परीक्षांमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेली कर्मचाऱ्यांच्या मुलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते विविध संशोधन पुस्तिका आणि वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमामध्ये संस्थेचे उपाध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी, सुजित गिजरे, अलोक जुनेजा तसेच संस्थेतील तज्ज्ञ आणि शेतकरी उपस्थित होते. डॉ. संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.जयंत खडसे यांनी आभार मानले. प्राजक्ता देशमुख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Livestock Treatment Services: जनावरांचे दवाखाने दोन सत्रांत उघडणार

PM Kisan Scheme: पीएम किसान योजनेचे अडीच लाख लाभार्थी

Satara Agriculture Exhibition: ‘कृषी’च्या विभागीय प्रदर्शनात ३.२५ कोटींचे करार

Agriculture Sales Center: शेती उत्पादनासाठी वसईला विक्री केंद्र उभारणार

Unseasonal Rain Impact: अवकाळी पावसात कांदा पिकाची काळजी कशी घ्याल?

SCROLL FOR NEXT