Patgaon Dam Adani Power Project agrowon
ॲग्रो विशेष

Patgaon Dam Adani Power Project : गौतम अदानींना कोल्हापुरी हिसका, अखेर पाटगाव धरणावरील प्रकल्प रद्द

Patgaon Dam Project : पाटगांव मध्यम प्रकल्प अखेर रद्द करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांना लेखी पत्राने कंपनीने कळविले आहे.

sandeep Shirguppe

Adani Power Project Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्याची भाग्यलक्ष्मी असलेल्या पाटगाव धरणावर अदानी समुहाकडून वीज निर्मीती करण्याचा प्रकल्प उभारण्यात येणार होता. दरम्यान पाटगांव मध्यम प्रकल्प अखेर रद्द करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांना लेखी पत्राने कंपनीने कळविले आहे. याबाबत मागच्या २ महिन्यांपासून भुदरगड, राधानगरी आणि गारगोटी परिसरातील शेतकऱ्यांनी मोठे जनआंदोलन उभारले होते. तर राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर तसेच माजी खासदार राजू शेट्टची यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे या जनआंदोलनाला यश आले आहे.

भुदरगड तालुक्यातील पाटगाव मध्यम प्रकल्पामुळे भुदरगड तालुक्यातील ११५ गावे, वाड्यावस्त्यातील लाखो लोकांचा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि सुमारे १२ हजारहून अधिक हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. या प्रकल्पावर अदानीसमुहाकडून वीज निर्मीती करत सिंधुदुर्गला पाणी वळवण्यात येणार होते. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील हजारे शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यावर गदा येणार होती.

तालुक्यासाठी जीवनदायी असलेल्या या प्रकल्पावर अदानी ग्रीन एनर्जी कंपनी मार्फत अंजिवडे (ता.कुडाळ जि.सिंधुदुर्ग) गावाजवळ नविन धरण बांधण्यात येणार आहे. त्या धरणामध्ये तळंबा खोऱ्यातील साठविलेले पाणी उचलुन पाटगाव मध्यम प्रकल्पामध्ये साठवण्यात येणार असुन त्याचा वापर करुन २१०० मेगावॅट हायड्रोइलेक्ट्रिक पध्दतीने वीजनिर्मिती करणार होते.

या प्रकल्पामुळे भुदरगड तालुक्याच्या पाण्याचा प्रश्न भीषण झाला असता. यामुळे भुदरगड तालुक्यातील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरलेले होते. यामुळे हा प्रकल्प रद्द व्हावा याकरीता भुदरगड तालुक्यातील नागरीक व सर्वपक्षीय नेतेमंडळींनी अनेक आंदोलने केली. या पाठपुराव्यास यश आले असून आदानी ग्रुप मार्फत २३ जानेवारी रोजी कोल्हापूरचे जिल्हाधिकाऱ्याना संबधित कंपनीने लेखी पत्राद्वारे हा प्रकल्प रद्द केला असल्याची माहिती दिली. अशी माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

अदानी समूहाकडून जिल्हाधिकारी यांना २३ जानेवारी 2024 रोजी दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, सध्याच्या पाटगाव जलाशयातील प्रकल्पाच्या पाण्याच्या वापराबाबत गेल्या एक-दोन महिन्यांपासून बातम्या प्रसारित होत आहेत. मात्र, हे वृत्त खोटे असल्याचे आम्ही स्पष्ट करू इच्छितो.

पाटगाव 2100MW PSP प्रकल्प सध्याच्या पाटगाव जलाशयातील पाण्याचा वापर करत नाही. सिंधुदुर्गातील कार्ली नदीचे पाणी वरच्या जलाशयात टाकले जाईल आणि पाटगाव हे पंपिंग स्टोरेज प्लांट (बॅटरी) असल्याने तेच पाणी पंपिंग आणि जनरेशन दोन्हीसाठी वापरण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wheat Sowing : थंडीमुळे गव्हाची पेरणी वेगात

PESA : ‘पेसा’ क्षेत्राच्या पुनर्रचनेचा मार्ग मोकळा

Leopard Terror : बिबट्याच्या दहशतीमुळे अखंडित वीजपुरवठ्याची मागणी

Forest Department : वन विभागाच्या कारवाईत आठ टन खैराची लाकडे जप्त

Cow Milk Rate : गाय दूध खरेदी दरात तीन रुपयांची कपात

SCROLL FOR NEXT