Agriculture Transformer Agrowon
ॲग्रो विशेष

Electricity Transformer : रोहित्रांची क्षमता वाढवण्यासाठी निधी द्या

Shivendrasinhraje Bhosale : यासोबत गंजगोलाई हे लातूरचे ऐतिहासिक वैभव असून गंजगोलाईला जोडणारे रस्ते आणि परिसराच्या सुशोभीकरणाला निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

Team Agrowon

Latur News : जिल्ह्यात रोहित्र (डीपी) वारंवार नादुरुस्त होत असल्याच्या तक्रारी आहेत. भार वाढल्याने नादुरुस्तीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या रोहीत्रांची क्षमता वाढविण्यासाठी निधी द्यावा, अशी मागणी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बुधवारी (ता. पाच) जिल्हा वार्षिक योजना राज्यस्तरीय बैठकीत त्यांनी ही मागणी लावून धरली.

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्याच्या विकासासाटी मंजूर नियतव्ययापेक्षा जास्तीचा निधी देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे सांगितले. यासोबत गंजगोलाई हे लातूरचे ऐतिहासिक वैभव असून गंजगोलाईला जोडणारे रस्ते आणि परिसराच्या सुशोभीकरणाला निधी उपलब्ध करून देण्यात येईल. या कामाचा सविस्तर आराखडा सादर करावा, अशा सूचना पवार यांनी दिल्या.

दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीला पालकमंत्री भोसले, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार संजय बनसोडे, जिल्ह्याच्या पालक सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासह जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते व अधिकारी उपस्थित होते.

गंजगोलाईकडे जाणारे रस्ते आणि परिसराचे सुशोभीकरण करताना या वास्तूचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन त्यानुसार आराखडा तयार करावा. या आराखड्यात समाविष्ट कामे गंजगोलाईचे ऐतिहासिक स्थान अधोरेखित करणारी, या वास्तूला साजेशी आणि दर्जेदार होतील, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना पवार यांनी केल्या.

शहर आणि शहराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहण्यासाठी तातडीने उपाययोजना हाती घ्याव्यात. समन्वयाने काम करून शहर स्वच्छ राहील, यासाठी प्रयत्न करावेत. तसेच नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ind-US Trade Conflict : शेतकरी हितासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार: पंतप्रधान मोदी यांचे डोनाल्ड ट्रम्पला उत्तर

Agriculture Development: शेतकरी हिताच्या सूचनांना मान्यता कधी?

Maharashtra Startup Policy 2025: Government Approves Initiative to Launch 50,000 Startups | Breaking NewsMaharashtra Startup Policy 2025: New Government Initiative to Launch 50,000 Startups | Breaking NewsMaharashtra Startup Policy: स्टार्ट अप : संधी अन् आव्हाने

Agriculture Success Story: नाशिकच्या मातीत घेतले ‘ॲव्होकॅडो’चे यशस्वी उत्पादन

Alephata Onion Rate: आळेफाटा येथील उपबाजारात कांदा प्रति क्विंटलला १६०० रुपये

SCROLL FOR NEXT