Water shortage  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Shortage : खानदेशात पाणी टंचाई आराखड्यावरील तरतूद यंदा कमी

Water Defect : खानदेशात टँकरची समस्या ऑगस्टमध्येही होती. परंतु ही समस्या दूर झाली आहे. यंदा टंचाई आराखड्यावरची तरतूदही कमी करावी लागणार.

Team Agrowon

Jalgaon News : जळगाव ः खानदेशात टँकरची समस्या ऑगस्टमध्येही होती. परंतु ही समस्या दूर झाली आहे. यंदा टंचाई आराखड्यावरची तरतूदही कमी करावी लागणार असून, चांगला पाऊस झाल्याने टंचाई राहणार नाही, अशी स्थिती आहे.

जिल्ह्यात चाळीसगाव, अमळनेर तालुक्यांतील अनेक गावांत एप्रिलपासून भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला आहे. ऑगस्टमध्येही टँकर सुरूच होते. ऑगस्टमध्ये पाऊस काही भागात कमी होता. विहिरी, पाणी योजना स्रोतांचे पुनर्भरण करण्यास पुरेसा पाऊस नसल्याने या काळातही टंचाई कायम होती. चाळीसगाव, अमळनेरात सुमारे ३० गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा ऑगस्टमध्ये सुरू होता.

प्रशासनाने अमळनेरात २७ विहिरी अधिग्रहित केल्या होत्या. चाळीसगाात मन्याड, गिरणा धरण आहे. वरखेड लोंढे प्रकल्प अलीकडे तयार झाला आहे. अमळनेर तालुक्यातून तापी, बोरी व पांझरा नद्या वाहतात. मात्र, सिंचनाबाबत चाळीसगाव व अमळनेर तालुका तहानलेलाच असतो. यामुळे पावसाळ्यातही टंचाई असते.

त्यात मागील वेळेस पाऊस कमी राहिल्याने अडचणी होत्या. यंदा मात्र सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये टंचाई दूर झाली. कारण अनेक पाणी योजनांचे स्रोत बळकट झाले. नद्यांना पाणी वाहत होते. यातच तापी नदीवरील निर्माणाधीन असलेला पाडळसरे प्रकल्प सोडला, तर दुसरा एकही सिंचन प्रकल्प अमळनेर तालुक्यात नाही.

बोरी व पांझरा नदीवर साठवण व केटी वेअर बंधारे असले, तरी उन्हाळ्यात बहुतांश बंधारे कोरडे पडले होते. आता पाऊस जून व जुलैत १०० टक्के झाला. पण प्रकल्पांत जलसाठा कमी होता. यामुळे टंचाईची समस्या अधिकच गंभीर बनली होती. परंतु यंदा टंचाई आराखड्यावरील खर्च मागील वर्षाच्या तुलनेत ४० टक्के कमी करावा लागणार आहे. चाळीसगाव तालुक्यातील अनेक प्रकल्पांत जलसाठा मुबलक आहे.

टँकरची संख्या घटू शकते पावसामुळे चाळीसगाव, अमळनेर तालुक्यांत टँकरचे प्रस्ताव ऑगस्टमध्ये येण्याची स्थिती नव्हती. टँकर काही भागात सुरू होते. ते सप्टेंबरमध्ये बंद झाले. आता कुठेही टँकरबाबत मागणी नाही. कारण पाण्याची समस्या दूर झाली आहे. त्यातच अधिग्रहित केलेल्या काही विहिरींचीही फारशी गरज गावांत नाही. पाऊस आल्यानंतर टँकरसंख्या कमी झाली. ती सध्या शून्यावर आहे. पुढेही टँकरची गरज कमी राहील, अशी अपेक्षा किंवा अंदाज प्रशासन, ग्रामपंचायती व्यक्त करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT