FSSAI  Agrowon
ॲग्रो विशेष

FSSAI : बॉटलवरील १०० टक्के फळांच्या रसाचा दावा काढून टाका; ज्यूस कंपन्यांना एफएसएसएआयचा दणका

FSSAI Issues Advisory : फळ ज्यूस निर्मिती कंपन्यांकडून जाहिराती आणि पॅकिंग होणाऱ्या ज्यूस बॉटलवर १०० टक्के फळांच्या रसाचा दावा केलेला असतो. त्यावरून एफएसएसएआयने ज्यूस कंपन्यांना दणका दिला आहे. तसेच कंपन्यांनी केलेला दावा काढून टाका, अशा सूचना केल्या आहेत.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : देशातील विविध फळ ज्यूस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून जनतेची दिशाभूल होत असल्याचे समोर आले आहे. या कंपन्यांकडून जाहिराती आणि पॅकिंग होणाऱ्या ज्यूस बॉटलवर १०० टक्के फळांच्या रसाचा दावा करण्यात येतो. या दाव्यावरून फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात एफएसएसएआयने ज्यूस कंपन्यांना दणका दिला आहे. तसेच कंपन्यांकडून करण्यात आलेला दावा बॉटवरून काढून टाका अशा सक्त सूचना अन्न उत्पादन व्यवसायाशी संबंधित कंपन्यांना दिल्या आहेत. तसेच या सूचना तत्काळ लागू करा असेही एफएसएसएआयने ज्यूस कंपन्यांना बजावले आहे. त्यामुळे आता अन्न उत्पादक कंपन्यांना त्यांच्या जाहिरातींसह बॉटलवर केलेला १०० टक्के फळांचा रसाचा दावा करता येणार नाही.

१५ सप्टेंबरपर्यंतची मुदत

एफएसएसएआयने दिलेल्या निवेदनानुसार, अन्न उत्पादन व्यवसायाशी संबंधित कंपन्यांनी १०० टक्के फळांचा रस असा उल्लेख केलेला दावा काढून टाकायचा आहे. तर ज्या कंपन्यांनी असा दावा प्री-प्रिंटेड साहित्यावर केला आहे. तो १ सप्टेंबरपर्यंत नष्ट करायचा आहे.

तसेच अनेक ज्यूस कंपन्यांनी त्यांच्या पॅकिंगवर १०० टक्के फळांचा रस असा दावा केला आहे. तो चुकीचा असून हे वर्णनच चुकीचे आहे. जे लोकांची दिशाभूल करणारे आहे. त्यामुळे अन्न सुरक्षा आणि मानक-२०१८ (फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स रेग्युलेशन, 2018) नुसार असा दावा करण्याची कोणतीही तरतूद नाही.

या सर्व रसांमध्ये सर्वाधिक पाणी असते. त्यात थोड्या प्रमाणात फळांचा रस किंवा लगदा असतो. त्यामुळे तो १०० टक्के रस होत नाही. त्यामुळे अशा दिशाभूल करणाऱ्या दाव्यांवर पूर्णपणे बंदी घालायला हवी असे एफएसएसएआयने म्हटले आहे. तर एफएसएसएआयने सर्व फूड बिझनेस ऑपरेटर्सना (FBOs) या संदर्भात त्वरित कारवाई करण्याचे आदेश देखील दिले आहेत.

तसेच सर्व ज्यूस कंपन्यांना अन्न सुरक्षा आणि मानक नियमावलीच्या नियमांनुसार काम करण्यास सांगितले आहे. जर ज्यूसमध्ये प्रति किलो १५ ग्रॅमपेक्षा जास्त साखर असेल तर त्यांनी त्यांच्या उत्पादनास गोड ज्यूस म्हणून लेबल करावे अशाही सूचना एफएसएसएआयने केल्या आहेत.

याबरोबरच एफएसएसएआयने, अन्न सुरक्षा नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. दिशाभूल करणारे दावे करून आम्ही कोणत्याही कंपनीला ग्राहकांचे नुकसान करू देणार नाही. सर्व कंपन्यांनी फळांच्या रसांबाबत केलेल्या नियमांचे पालन करावे असे म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Field Visit: ‘माझा एक दिवस माझ्या बळिराजासाठी’ उपक्रमाअंतर्गंत प्रक्षेत्रभेटी

Agriculture Loan: ‘ॲग्रिकल्चर इज बेस्ट कल्चर’ शिबिराद्वारे एकूण २६ कोटींची कर्ज प्रकरणे मंजूर

OTP Verification: ओटीपी प्रमाणीकरण मान्य करा

Fruit Crop Insurance: फळ पीकविमा योजनेतून परताव्यांची प्रतीक्षा

Sugarcane FRP: ऊसाला इतिहासात पहिल्यांदाच मिळणार ३५०० चा पहिला हप्ता

SCROLL FOR NEXT