Nashik News : एप्रिल महिन्यात उन्हाचा चटका वाढला असून तापमान ४० अंशावर गेले आहे. अशा परिस्थितीत भाजीपाला व फळपिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रयत्नांची पराकाष्टा सुरू आहे. याच धर्तीवर शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाची व सुधारित पद्धतीचा अवलंब सुरू केला आहे. सध्या पिके वाचवण्यासाठी आच्छादित शेतीचा पर्याय शेतकऱ्याने स्वीकारला आहे.
सध्या उत्पादन घेताना तसेच पिकांच्या वाढीच्या अवस्थेत तापमान वाढ हे सध्याचे मुख्य आव्हान आहे. सध्या पाण्याची टंचाई भासत असल्याने पाणी उपलब्धतेनुसार शेतकरी पिकांचे लागवड नियोजन करत आहेत.
पाणी टंचाईच्या काळात फळबागेत बाष्पीभवनाचा वेग कमी करण्यासह तीव्र सूर्यप्रकाश थेट मुळ्यांवर पडून त्यापासून होणारी इजा कमी करणे गरजेचे असते. यासाठी सेंद्रिय आच्छादनाचा जोड यासोबत शेतकरी देत आहेत.
पाण्याची बचत जमिनीतील ओलावा दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत होते. शिवाय जमिनीचे तापमान व आर्द्रता नियंत्रित राहिल्याने शेती उत्पादन गुणवत्तेत वाढ होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
पिकांनुसार वापर ...
विविध पिकांना वेगवेगळे उपलब्धतेनुसार आच्छादन करणे गरजेचे आहे. टोमॅटो, मिरची या भाजीपाला पिकांसाठी नेटलॉन वापर केला जात आहे तर पेरूसाठी झाड झाकण्यासाठी नेट लावून सोबत झाडांवरील फळांचे तीव्र सूर्यप्रकाशापासून संरक्षण करण्यासाठी फोम कव्हर लावण्यात येतात. तर खरबूज, टरबूज व डाळिंब अशा पिकांसाठी एक वेळ वापरासाठी असलेले क्रॉप कव्हर किंवा दोन ते तीन वर्षे टिकणारे नेटलॉन वापरले जाते. तर केळी, पपई लागवडीत रोपे वाचवण्यासाठी क्रॉप कव्हरचे अच्छादन रोपांभोवती लावण्यात येते.
पीकनिहाय शेतकऱ्यांना फायदे असे
तापमान व हंगामानुसार क्रॉप कव्हर टाकण्यासह फळांना बॅगेचे आच्छादन केल्याने फळमाशी,सनबर्निंग यांच्यापासूनही संरक्षण.
तापमानवाढीमुळे पाने पिवळी पडण्यासह फळांना चट्टे पडतात. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून ३० टक्के नाकारला जाण्याची शक्यता असते.मात्र नेट कव्हरमुळे तापमान नियंत्रित होऊन झाड अशक्त न होता पाने चांगली राहतात.फूलगळ होत नाही. बाष्पीभवन कमी होऊन पाण्याची गरज कमी होते.
उन्हाच्या तीव्र सूर्यकिरणामुळे भाजीपाला उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे नुकसान टाळण्यासह सूर्यकिरण तीव्रता कमी करण्यासाठी नेटलॉनचा वापर करत आहे. सध्या घेवडा पिकासाठी वापर केला आहे.- गणेश कसबे, भाजीपाला उत्पादक, वडगाव, ता. जि. नाशिक
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.