Mango Crop  Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Fruit Fall : तापमानवाढीमुळे रत्नागिरीत फळ भाजण्यासह गळती

जिल्ह्यात तापमान वाढत आहे. उन्हाच्या झळ्या अधिकच असह्य होत आहेत. त्याचा प्रतिकूल परिणाम कोकणातील आंबा, काजू पिकावर होत आहे.

Team Agrowon

Ratnagiri News : गेल्या काही दिवसांमध्ये तापमान कमालीचे वाढले आहे. त्याचा आंबा-काजू पिकावर (Mango, Cashew Crop) परिणाम झाला असून फळ भाजण्यासह फळगळतीचे प्रमाण वाढले आहे.

तालुक्याच्या पश्‍चिम किनारपट्टीवरील नाटे, आडीवरे़ नाणार, साखर यासह आजूबाजूच्या परिसरातील आंबा बागांमध्ये फळगळती आणि आंबा फळ भाजण्याचे प्रमाण अधिक आहे.

आधीच आंबा-काजू बागायतदारांच्या खर्च-उत्पन्नाचे गणित यावर्षी बिघडलेले असताना तापमान वाढीमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीचे चटके बागायतदारांना सहन करावे लागत आहेत.

जिल्ह्यात तापमान वाढत आहे. उन्हाच्या झळ्या अधिकच असह्य होत आहेत. त्याचा प्रतिकूल परिणाम कोकणातील आंबा, काजू पिकावर होत आहे.

ज्या बागांमधील झाडांना सुरुवातीला मोहोर येऊन फळधारणा झाली आहे, त्या बागांमध्ये फळे परिपक्व होऊन काढणीच्या स्थितीत आहेत.

अनेक बागांमधील झाडांवर अर्धवट भाजलेल्या स्थितीत तयार फळे दिसत आहेत. तर, काही झाडांच्या बुंध्याखाली फळे गळून गेली आहेत. वाढत्या तापमानामुळे फळगळती होऊन बागायतदारांना आर्थिक नुकसानीचे चटके सहन करावे लागणार आहेत.

तालुक्याच्या पश्‍चिम भागांमधील बागांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. उशिरा मोहोर, तुडतुड्यांचे जास्त प्रमाण, प्रतिकूल हवामान याला तोंड देत आंबा टिकविण्यासाठी बागायतदारांनी मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे.

मिळणाऱ्या उत्पन्नातून कीटकनाशक फवारणीसह मशागती आणि कामगारांसाठी करण्यात येणारा खर्च भागविणेही मुश्किल आहे.

वाढलेले तापमान आणि प्रतिकूल वातावरणामुळे बागायतदारांना आर्थिक नुकसान होत आहे. याचा सकारात्मक विचार होऊन शासनाने बागायतदारांना तातडीने मदत द्यावी.
ओंकार प्रभूदेसाई, आंबा बागायतदार
फळगळती आणि आंबा फळ भाजण्याचे प्रमाण वाढल्याचा प्राथमिक अंदाज होता. तालुक्यातील नाटे परिसरातील गावांमध्ये आंबा फळगळती आणि भाजण्याचे प्रमाण दिसत आहे. नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे काम कृषी विभागाकडून सुरू आहे.
अनिल गावीत, तालुका कृषी अधिकारी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Sowing: कपाशीची ८ हजार ६७१ हेक्टर लागवड उगवण संकटात

Kharif Sowing Issues: पुसद तालुक्यात ७० हजार हेक्टरवरील पेरण्या रखडल्या

Vidarbha Water Crisis: विदर्भावर जलसंकटाचे सावट

Ahilyanagar Politics: पंचवीस टक्के ताकद वापरली तरी आमदार पाडू शकतो

Sugarcane Price: विलास साखर कारखान्याकडून उसाला ३,१७१ रुपये दर

SCROLL FOR NEXT