Orange Fruit Fall Agrowon
ॲग्रो विशेष

Orange Disease : संत्रापट्ट्यात फळगळीची समस्या

Orange Fruit Fall : संततधार पावसाच्या परिणामी संत्रा बागांमध्ये पाणी साचल्याने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amaravati News : संततधार पावसाच्या परिणामी संत्रा बागांमध्ये पाणी साचल्याने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्याच कारणामुळे संत्रा-मोसंबी बागांमध्ये फळांची मोठ्या प्रमाणावर गळ होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

राज्यात सुमारे दीड लाख हेक्‍टरवर संत्रा लागवड आहे. त्यातील एक लाख हेक्‍टर क्षेत्र एकट्या अमरावती जिल्ह्यात असून, २५ हजार हेक्‍टर नागपूर, तर २५ हजार उर्वरित महाराष्ट्रात क्षेत्र आहे. वरुड, मोर्शी हे दोन तालुके संत्रा लागवड व उत्पादनासाठी राज्यात प्रसिद्ध आहेत. त्यामुळेच या भागाला विदर्भाचा कॅलिफोर्नियाही म्हटले जाते.

मात्र संत्रापट्ट्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाची संततधार होती. सध्या झाडावर आंबिया बहरातील फळे असून, ती लिंबापेक्षा थोड्या मोठ्या आकाराची आहेत. पावसामुळे बागेत मशागतीसह इतर कोणतीच कामे करणे शक्‍य झाले नाही. त्याच्याच परिणामी बागेत बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला.

त्यातूनच फळाच्या देठाजवळील भाग सुरुवातीला पिवळा आणि नंतर काळवंडत असे फळ नंतर गळून पडत असल्याचे चित्र आहे. वरुड तालुक्‍यातील वघाळ, राजुरा बाजार, आलोडा, नांदगाव, हातुर्णा, गाडेगाव, वंडली, भापकी, बेलोरा, लोणी, अमडापूरसह सर्वच भागांत ही समस्या गंभीर झाली आहे. होणारी गळ पाहता झाडांवर फळे राहतील की नाही या बाबतही शेतकरी साशंक आहेत.

मोसंबी झाडावर एवढ्या मोठ्या प्रमाणात गळ आजवर पाहिलेली नाही. फळगळती सतत होत असल्याने झाडांवर फळे शिल्लक राहतील किंवा नाही या विषयी मनात भीती आहे. तज्ज्ञांच्या पथकाने या भागातील फळगतीच्या समस्येची दखल घेत बागांना भेटी देऊन मार्गदर्शन करण्याची गरज आहे. त्यासोबतच आजवर गळती झालेल्या फळांसाठी शासकीय मदतीचीही अपेक्षा आहे.
- अरुण कुसरे, मोसंबी बागायतदार, गाडेगाव, अमरावती
झाडावर १००० फळे असतील, तर २०० फळांची गळ होत आहे. त्यानुसार सुमारे २० टक्‍के नुकसान आहे. शासनाने हा प्रकार गांभीर्याने घेत केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेच्या तज्ज्ञांना या भागात मार्गदर्शनाकामी पाचारण करण्याची गरज आहे. या भागातील अर्थकारण याच पिकावर असल्याने हे पीक धोक्‍यात आल्यास अर्थकारण प्रभावित होईल.
- रमेश जिचकार, संत्रा बागायतदार, वरुड
सततच्या पावसामुळे फायटोप्थोरा या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. अशावेळी संत्रा उत्पादकांनी कृषी विद्यापीठ किंवा संशोधन संस्थेतील तज्ज्ञांच्या सल्ल्याने रासायनिक घटकांचे ‘ड्रेंचिंग’ करावे. साचलेले पाणी चर खोदून शेताबाहेर काढावे.
- डॉ. के. पी. सिंह, प्रमुख, केव्हीके दुर्गापूर (बडनेरा, अमरावती)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT