Success Story Agrowon
ॲग्रो विशेष

Success Story : शेतकऱ्याच्या घरातून डॉक्टरपर्यंतचा यशस्वी प्रवास

Agriculture News : जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलेला सनपुले (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील शेतकरी पुत्र गौरव संजय गुर्जर (पाटील) याने मुंबई येथील सायन वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले.

Team Agrowon

Jalgaon News : जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलेला सनपुले (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील शेतकरी पुत्र गौरव संजय गुर्जर (पाटील) याने मुंबई येथील सायन वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले.

गौरव हा सनपुले येथील मच्छिंद्र पाटील यांचा नातू आहे. मच्छिंद्र यांचे पुत्र संजय व किरण हे दोन्ही शेतकरी आहेत. गौरवची आई मीनाबाई यांचे माहेर कुरवेल येथील असून, त्यादेखील शेतकरी कुटुंबातील आहेत.

कुटुंबात शासकीय नोकरी किंवा वैद्यकीय, अन्य सेवांचा कुठलाही वारसा नसताना गौरव याने वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएसची पदवी प्रथम श्रेणीत मिळविल्याने त्याचे कौतुक केले जात आहे. गौरव याने प्राथमिक शिक्षण आपल्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत घेतले.

पुढे चोपडा येथील कालभैरव माध्यमिक विद्यालयात त्याने शिक्षण घेतले. दहावीला तो विद्यालयात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता. पुढे एमबीबीएससाठी देखील त्याला गुणांच्या बळावर (मेरिट) शासकीय महाविद्यालयात शिकण्याची संधी (फ्री शीप) मिळाली.

हे नेत्रदीपक यश आई-वडील आणि काका किरण गुर्जर व काकू कविता यांच्या आशीर्वादाने मिळाले. तसेच गुरू, शिक्षक या सर्वांनी मार्गदर्शन केले, अशी प्रतिक्रिया गौरव याने दिली. किरण गुर्जर हे शेतकरी संघटनेत सक्रिय आहेत.

केळी, पपई, कापूस, तेलबिया पिकांची यशस्वी शेती गुर्जर कुटुंबीय सनपुले येथे करीत आहेत. त्याचा नुकताच गावातील विद्यालयात विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी व संदीप पाटील यांच्या हस्तेदेखील सत्कार करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT