Textiles Park Agrowon
ॲग्रो विशेष

Textile Park : कॉटन बेल्टला प्रतीक्षा टेक्स्टाईल पार्कची

Cotton Farming : देशातील सर्वात लांब धाग्याचा कापूस केळापूर तालुक्यात पिकवला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या कापसाला मोठी मागणी असून, दरही चांगला मिळतो.

Team Agrowon

Yavatmal News : देशातील सर्वात लांब धाग्याचा कापूस केळापूर तालुक्यात पिकवला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या कापसाला मोठी मागणी असून, दरही चांगला मिळतो. परंतु तालुक्यात एकही कापूस प्रक्रिया उद्योग नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. टेक्स्टाईल पार्कबाबत दिलेल्या आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पाळावे, अशी स्थानिकांची मागणी आहे.

तालुक्यातील ९० टक्के शेतकरी कापूस उत्पादक असताना येथे कोणतीच एमआयडीसी किंवा लहान-मोठा एकही उद्योग तसेच कापसावर आधारित प्रक्रिया करणारा एकही उद्योग नाही.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर्णी येथील सभेत सत्तेत आल्यास या भागात टेक्स्टाईल पार्क उभारण्यात येईल, असे आश्वासन जाहीर सभेत शेतकऱ्यांना दिले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादक असणाऱ्या शेतकऱ्यांना आता मुख्यमंत्री आपला शब्द पाळतील का व टेक्स्टाईल पार्क मिळेल काय, याकडे लक्ष लागले आहे.

कापसाचा शोध गृसमत ऋषींनी यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथे लावला अशी आख्यायिका आहे. यामुळे या भागाला कापसाची जननी संबोधले जाते. परंतु कापूस जरी मुबलक प्रमाणात पिकत असला तरी प्रक्रिया करणारा उद्योग परराज्यात असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागते.

एकमेव सूतगिरणी जमीनदोस्त

पांढरकवडा येथे कापसावर आधारित प्रक्रिया करणारी एकमेव सूतगिरणी होती. त्यामुळे हजारो हाताला काम मिळाले. पण, राजकीय उदासीनतेमुळे ती आता जमीनदोस्त करण्यात आली. त्यामुळे हजारो कामगार बेरोजगार झाले.

टेक्स्टाईल पार्क झाल्यास मोठी रोजगार निर्मिती होऊ शकते. कापूस पिकविणाऱ्या या भागात टेक्स्टाईल पार्क झाल्यास हजारो तरुणांना रोजगाराची संधी मिळू शकते. त्या अनुषंगाने नव्यानेच निवडून आलेल्या आमदारांनी प्रयत्न करावे, अशी या परिसरातील जनतेची मागणी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT