Gharkul Yojana Agrowon
ॲग्रो विशेष

Maha Awas Yojana : ‘महाआवास’ मध्ये जिल्ह्याला चार पुरस्कार

Gharkul Scheme : केंद्र व राज्य पुरस्कृत घरकुल योजनांच्या अंमलबजावणीत गतिमानता व गुणवत्ता आणण्यासाठी राज्यात ‘महाआवास अभियान’ राबविण्यात येत आहे. २०२१-२२ मध्ये महाआवास अभियानात सोलापुर जिल्ह्याने राज्यस्तरीय चार पुरस्कार मिळविले.

Team Agrowon

Solapur News : केंद्र व राज्य पुरस्कृत घरकुल योजनांच्या अंमलबजावणीत गतिमानता व गुणवत्ता आणण्यासाठी राज्यात ‘महाआवास अभियान’ राबविण्यात येत आहे. २०२१-२२ मध्ये महाआवास अभियानात सोलापुर जिल्ह्याने राज्यस्तरीय चार पुरस्कार मिळविले. मुंबईत या पुरस्काराचे नुकतेच वितरण झाले.

दोन वर्षापूर्वी २०२१-२२ मध्ये राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे पुरस्कार वितरण व २०२३-२४ महाआवास अभियानाचा प्रारंभाचा कार्यक्रम मुंबईमध्ये ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नुकताच झाला. ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, संचालक राजाराम दिघे उपस्थित होते.

‘महाआवास अभियान’ कालावधीत ज्या लाभार्थ्यांची घरकुले पूर्ण झालेली आहेत. त्यापैकी किमान दहा टक्के लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी वाळूला पर्याय क्रश सँड, सिमेंट ब्लॉक, फ्लॉय ॲश ब्रिक्स, इंटरलॉकिंग, हॉलो ब्रिक्स आदींचा वापर करून तयार केलेली घरकुले या उपक्रमामध्ये जिल्ह्यास राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे.

ज्या लाभार्थ्यांची घरकुले पूर्ण झाली आहेत, त्यापैकी किमान दहा टक्के लाभार्थ्यांना घरकुल बांधकामांमध्ये फरशी, लादी, रंगरंगोटी, किचन गार्ड आदींचा वापर करून तयार केलेली घरकुले या उपक्रमांतही जिल्ह्यास राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.

भूमिहीन लाभार्थ्यांना जागा देणे, मंजुरी देऊन घरकुले पूर्ण करणे यामध्ये निंबर्गी (ता. दक्षिण सोलापूर) ग्रामपंचायतीने सर्वोकृष्ट ग्रामपंचायत म्हणून प्रथम पुरस्कार मिळविला. लाभार्थ्यांना जागेसह गवंडी प्रशिक्षणाचा लाभ देऊन एक गृहसंकुल तयार करण्यात आले. त्यास राज्यस्तरावरील सर्वोकृष्ट गृहसंकुल या नामांकनाचा प्रथम पुरस्कार भांबुर्डी (ता. माळशिरस) ग्रामपंचायतीला मिळाला.

जिल्ह्यात यावर्षीही घरकुलाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. २०२३-२४-मध्ये सुद्धा सोलापूर राज्यात अग्रेसर कसा राहील, याकडे आम्ही लक्ष देणार आहोत.

- डॉ. सुधीर ठोंबरे, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सोलापूर.

जिल्ह्यास महाआवास अभियानामध्ये चार पुरस्कार प्राप्त झाले. पुढील वर्षी यापेक्षा अधिक पुरस्कार कशाप्रकारे प्राप्त होतील, याचे नियोजन आम्ही करू.
- मनीषा आव्हाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Agricultural Council: कृषी परिषदेला मिळेना पूर्णवेळ संचालक

Ajit Pawar: इच्छाशक्ती असेल तर बदल घडवता येतो; पवार

Crop Loss Compensation: पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू ः अजित पवार

Maharashtra Sugar Industry: वारेमाप ‘एफआरपी’ची स्पर्धा,आर्थिक बेशिस्त थांबवा

Mahatma Phule Agricultural University: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या यंत्रांना पेटंट

SCROLL FOR NEXT