Suresh Prabhu Agrowon
ॲग्रो विशेष

Suresh Prabhu : माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची अॅग्रीकल्चर फोरम बोर्डवर नियुक्ती

Dhananjay Sanap

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची वर्ल्ड अॅग्रीकल्चर फोरम बोर्डवर (डब्ल्यूएएफ) नियुक्ती करण्यात आले आहे. डब्ल्यूएएफने याबद्दलची घोषणा गुरुवारी (ता.५) केली. प्रभू यांच्या नियुक्तीबद्दल बोर्डाचे अध्यक्ष रुडी रॅबिंज यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

रॅबिंज म्हणाले, "कृषी क्षेत्राच्या भविष्याला आकार देणाऱ्या चर्चेसाठी प्रभू यांचे कौशल्य बहुमोल ठरेल. जागतिक अन्न आणि कृषी क्षेत्रात प्रभू यांची भूमिका आणि आदरणीय स्थान पाहता, मला विश्वास आहे की, डब्ल्यूएएफसाठी अमूल्य असाल." असंही रॅबिंज यांनी विश्वास व्यक्त केला. जगभरातील कृषी क्षेत्राचा विकास घडवून आणण्यासाठी डब्ल्यूएएफ काम करतं.

पुढे रॅबिंज म्हणाले, " प्रभू यांच्या अंतर्दृष्टी आणि अनुभवाचा आम्हाला फायदा होईल. हवामान बदल आणि जागतिक अन्न सुरक्षा, तंत्रज्ञानातील प्रगती. जागतिक व्यापार आणि व्यवसायाची गती याचं कृषी क्षेत्रासमोर आव्हान आहे. यावर काम करणं डब्ल्यूएएफ उद्दिष्ट आहे." असं रॅबिंज यांनी सांगितलं.

डब्ल्यूएएफ अन्न आणि पोषण सुरक्षा, शाश्वत पद्धती, धोरण व व्यापार निर्मितीशी संबंधित गंभीर समस्यांचं निराकरण करण्याचं काम करतं. त्यासाठी कृषी क्षेत्रातील प्रमुख विचारवंत, धोरणकर्ते, व्यावसायिक, जागतिक संस्थांचे प्रमुख यांना एकत्र करण्याचा डब्ल्यूएएफचा उद्देश आहे. यामध्ये जागतिक अन्न सुरक्षा, आर्थिक स्थैर्य आणि पर्यावरणीय स्थिरता यासाठी प्रयत्न केले जातात.

रॅबिंज म्हणाले की, कृषी क्षेत्रातील आव्हाने आणि त्यावर परस्पर संवाद आणि सहकार्यातून सुविधा उपलब्ध करणं संस्थेची जबाबदारी आहे. जेणेकरून राष्ट्रांमध्ये व्यापाराची संधी, तंत्रज्ञानाची देवाणघेवाण सुलभ करण्यासाठी कृषी उत्पादकता, कृषी व्यापार आणि गुंतवणुकी सुधारण्यासाठी प्रभावीपणे सहकार्य राष्ट्रे करतील, याची खात्री करण्यासाठी डब्ल्यूएएफ महत्त्वपूर्ण भूमिका बजावते." असा दावाही रॅबिंज यांनी केला.

दरम्यान, अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या मंत्रीमंडळात प्रभू यांच्याकडे केंद्रीय उद्योग खात्याची जबाबदारी देण्यात आली होती. पुढील काळात त्यांनी विविध खात्याची जबाबदारी सांभाळली. नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळात सुरेश प्रभू वाणिज्य मंत्री राहिले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT