Bidri Sugar Factory Kolhapur agrowon
ॲग्रो विशेष

Bidri Sugar Factory Kolhapur : ‘बिद्री’ साखर कारखाना बंद पाडण्याचा आबिटकरांकडून प्रयत्न

Prakash Abitkar : सह्याद्री कारखाना कित्येक वर्षे सुरू होण्याच्या प्रतीक्षेतच असून देवर्डे येथील नियोजित कारखाना २५ वर्षांच्या कराराने बीओटी तत्त्वावर दुसऱ्या कुणाला चालविण्यास देण्याची चर्चा आहे.

sandeep Shirguppe

Bidri Sugar Factory :कोल्हापूर जिल्ह्यात उच्चांकी दर देणारा बिद्री सहकारी साखर कारखाना बंद पाडण्यासाठी विद्यमान आमदार आबिटकर प्रयत्न करत आहेत. आबिटकर हे सह्याद्री आणि देवर्डे साखर कारखाना उभारण्याच्या गप्पा झोडत आहेत. परंतु, ज्यांनी बिद्री कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न केला, ते आता ही भाषा कशी काय करतात?. असा सवाल बिद्री साखर कारखान्याचे संचालक फिरोजखान पाटील यांनी केला.

सोमवारी (ता.१८) महाविकास आघाडीचे उमेदवार के. पी. पाटील यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत महायुतीचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली.

के. पी. पाटील म्हणाले, ‘राजकारणात विरोधक जरूर असावेत, परंतु चांगल्यालासुद्धा विरोध आणि जेथे जाईल तेथे ठोकशाही पद्धत वापरायची हे बरोबर नाही. बिद्री साखर कारखाना बंद पाडण्यासाठी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करणे, शासकीय कार्यालयांत खरे-खोटे, चूक-बरोबर न पाहता ठोकशाहीचा अवलंब करणे ही आमदारांची कृती लोकशाहीला मारक ठरल्याचे दहा वर्षांत दिसून आले. ही ठोकशाही जनता या निवडणुकीत झुगारून देईल असे पाटील म्हणाले.’

संचालक उमेश भोईटे म्हणाले, ‘आमदार आबिटकर हे केवळ मतांवर डोळा ठेवून काम करत आहेत. धामोडचा नवणे अण्णांचा सह्याद्री साखर कारखाना आणि देवर्डे साखर कारखाना उभा करण्यासाठी मदत करणार असल्याचे सांगत आहेत. सह्याद्री कारखाना कित्येक वर्षे सुरू होण्याच्या प्रतीक्षेतच असून देवर्डे येथील नियोजित कारखाना २५ वर्षांच्या कराराने बीओटी तत्त्वावर दुसऱ्या कुणाला चालविण्यास देण्याची चर्चा आहे. मात्र, आमदार आबिटकर हे ऐन निवडणुकीच्या तोंडावर या कारखान्यांना उभारी देण्याची भाषा बोलतात, ही खूप मोठी विसंगती असल्याचे भोईटे म्हणाले.’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parbhani Rainfall Deficit: परभणीत ९५ टक्के खरिपाला फटका

Pune Dams: धरण साखळीतील साठा ९६.८२ टक्क्यांवर

Marathi Literary Conference: दक्षिण भारतातील पहिलेच मराठी साहित्य संमेलन तंजावरला होणार

Agriculture PG Admission: केंद्रनिहाय केंद्रीभूत प्रवेश फेरी आजपासून पुण्यात सुरू

Maharashtra Rain Forecast: राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT