Forest Conservation  Agrowon
ॲग्रो विशेष

Forest Conservation : ‘माझे वन’ योजनेअंतर्गत ३३८ एकर क्षेत्र हरित

Tree Plantation Scheme : ‘माझे वन’ ही सरकारची नावीन्यपूर्ण योजना असून, त्‍या माध्यमातून प्रत्येक रेंजमध्ये सुरंगी आणि बहाडोली या जांभळाच्या जातीची झाडे १०० एकरमध्ये लावण्याचे उद्दिष्‍ट आहे.

Team Agrowon

Karjat News : ‘माझे वन’ ही सरकारची नावीन्यपूर्ण योजना असून, त्‍या माध्यमातून प्रत्येक रेंजमध्ये सुरंगी आणि बहाडोली या जांभळाच्या जातीची झाडे १०० एकरमध्ये लावण्याचे उद्दिष्‍ट आहे. यासाठी प्रत्येक वन कर्मचाऱ्यांनी वन विभागाच्या कार्यक्षेत्रातील किमान एक एकर क्षेत्राची निवड करून यंदाच्या पावसाळ्यात स्वेच्छेने व स्वखर्चाने त्यांच्या पसंतीच्या वृक्षांची लागवड करायची आहे.

तसेच निश्चित क्षेत्रातील रोपांचे संरक्षण व संगोपनही करायचे आहे. या योजनेंतर्गत वनीकरण केल्यास साधारण ३३८ एकर क्षेत्रावर वनसंवर्धन होईल, असा विश्‍वास वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला.

वनपरिक्षेत्र अधिकारी, माथेरान कार्यालय आणि तपासणी नाका या नूतन इमारतीचे गुरुवारी उद्‌घाटन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. वन विभागाचे सौंदर्यीकरण, सशक्तीकरण आणि मजबुतीकरण करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी या वेळी दिली.

कार्यक्रमास आमदार महेंद्र थोरवे, राज्याचे प्रधान सचिव वन बल प्रमुख शोमिता विश्वास, मुख्य वनसंरक्षक ठाणे के. प्रदीपा, उप वनसंरक्षक राहुल पाटील, प्रांताधिकारी प्रकाश संकपाळ, पनवेल माजी नगराध्यक्ष सुनील घरत आदी उपस्थित होते.

वनसंवर्धनासाठी सामंजस्‍य करार

जागतिक दर्जाच्या ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्रासाठी नागाव ग्रामपंचायत आणि वन विभाग यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. तसेच एआय तंत्रज्ञानासाठी युनिव्हर्सल बिझनेस स्कूलबरोबर करार करण्यात आला.

वनसंरक्षण आणि वनसंवर्धन यामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल नागरिकांचा या वेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी केले. या वेळी त्यांनी अलिबाग वन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची आणि माझे वन या संकल्पनेबद्दल माहिती  दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Warehouse Receipt: पूर्व युरोप, मध्य आशिया खंडातील गोदाम पावती वित्तपुरवठा

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

Fake Agri Inputs: निविष्ठांवर सरकारचे नियंत्रण किती?

Sulabh Seva Chatbot: महसूल विभागाच्या सेवांसाठी देणार ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’

Eknath Shinde: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नाही

SCROLL FOR NEXT