Pune News: राज्य कृषी पणन मंडळ आयोजित केलेल्या आंबा महोत्सवास चोखंदळ हापूस प्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यावर्षी ग्राहकांना कोकणातील दर्जेदार, शुद्ध आणि अस्सल ‘यूआयडी टॅग’ प्राप्त आंबा ग्राहकांना आता पुण्यात चार विविध ठिकाणी उपलब्ध झाला आहे. गेल्या १० दिवसांत एक कोटी रूपयांच्या आंब्याची विक्री झाली आहे.
दरवर्षी ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ योजनेअंतर्गत मार्केट यार्डात आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. मात्र पुणेकरांसाठी प्रथमच पुणे शहरात मार्केट यार्डसह इतर तीन ठिकाणी आंबा महोत्सवाचे आयोजन केले आहे. ‘जीआय’ आणि ‘यूआयडी टॅग’ लावलेला आंबा ग्राहकांना विकला जात आहे. यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत असून ग्राहकांचीही फसवणूक होत नाही. या महोत्सवात १५० शेतकऱ्यांना १२० स्टॉल उपलब्ध केले आहेत. त्यात हापूस, केसर, पायरी आणि बिटकी (लहान) आंब्याचा समावेश आहे.
यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांतील भौगोलिक मानांकन (जीआय) मिळालेला हापूस आंबा, तसेच राज्यातील केसर, पायरी व इतर वाणांचा आंबा उपलब्ध आहे. महोत्सवात १७५ ते ३०० ग्रॅम वजनाच्या आंब्याची विक्री करण्यात येत आहे. यात ७०० ते १५०० रुपये प्रति डझन भाव आहे. महोत्सवाच्या पहिल्या १० दिवसांमध्ये १५ हजार डझन आंब्याची विक्री झाली. त्यातून सुमारे एक कोटीची उलाढाल झाल्याची माहिती पणन मंडळाने दिली.
आंबा महोत्सवाची ठिकाणे
पणन मंडळामार्फत एक एप्रिल ते ३१ मेपर्यंत मार्केट यार्डातील ‘पीएपीएमएल’च्या बस डेपोजवळ गेट क्रमांक नऊ मार्केट यार्ड, गांधी भवन मैदान-कोथरूड, मगरपट्टा-सिझन्स मॉलजवळ खेळाचे मैदान आणि झेन्सार कंपनीजवळील खेळाचे मैदान, खराडी या चार ठिकाणी आंबा महोत्सवाचे आयोजन केले आहे.
यंदा पहिल्या टप्प्यातील आंबा कमी होता. मात्र आता दुसऱ्या टप्प्यातील आंब्याचे नियमित उत्पादन सुरू झाले असून, हंगाम सुरळीत झाला आहे. यंदाच्या महोत्सवाचे वैशिष्ट्ये हे जीआय टॅगिंग आंबा उपलब्ध आहे. प्रत्येक फळावरील विशिष्ट सांकेतांक क्रमांकाच्या माध्यमातून ते फळ कोणत्या शेतकऱ्यांच्या बागेतून आले आहे. त्याची सविस्तर माहिती उपलब्ध होत आहे. याद्वारे कोकणातील अस्सल हापूस शेतकऱ्याकडून थेट ग्राहकांना मिळत आहे.सुहास काळे, व्यवस्थापक, देशांतर्गत व्यापार विकास विभाग
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.