
Mango Rate Kolhapur : कोल्हापूर बाजारात हंगामी देवगड हापूस आंबा दाखल झाला आहे. हा हापूस आंबा लक्ष वेधून घेत आहे. सध्या बाजारात आंबा ४ हजार ते ४ हजार ५०० रुपये डझन आहे. आंब्याची आवक अत्यंत कमी झाली असली तरी ग्राहकांमध्ये आंबा आल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, फळबाजारात हंगाम नसल्याने अपेक्षित उलाढाल थांबली आहे. मात्र, कलिंगडची नवीन आवक जोमात सुरू आहे. बाजारसमितीत कलिंगडची आवक वाढत आहे तर जिल्ह्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी कलिंगडचे स्टॉल लावले आहेत.
भाजीपाल्याच्या आवकेत वाढ झाली आहे तर वाटाण्याचा दरात घट पहायला मिळत आहे. प्रतिकिलोस वाटाण्याचे दर १० रूपयांनी उतरले आहेत. पालेभाज्यांची आवक वाढली असले तरी दर मात्र जैसे थे आहेत. लसणाची नवीन आवक सुरू झाली आहेत. नवीन लसणाचे भाव कमी तर जुन्या लसणाला काहीसे जादा पैसे मोजावे लागत आहेत. पेरणीसाठी जुन्या लसणाला मागणी वाढली आहे.
धान्यबाजारात तूरडाळ आणि हरभराडाळीच्या दरात मोठी घट झाली आहे. तसेच हरभऱ्याचे दरही घटले आहेत. नवीन आवक सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर दर कमी झाल्याचे धान्य व्यापाऱ्यांनी सांगितले. यंदा हरभऱ्याची परदेशी आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने दरावर परिणाम होत आहे. हरभरा, तूरडाळींचे दर उतरल्याने इतर डाळींचे दरही उतरू लागले आहेत.
लग्नसराईमुळे फुलांचा दर तेजीत
लग्नसराईमुळे फुलांची मागणी वाढली आहे. तुलनेने जिल्ह्यात आवक कमी आहे तर मागणी जास्त आहे. ऐन हंगामात मागणी वाढल्याने फुलांना भाव वाढला आहे. निशिगंधाचे भाव जवळपास डबल झाला आहे तर फुलांचे दरही ५० ते ६० टक्क्यांनी वाढले आहेत. लग्नसराईमुळे फुलांचा भाव असाच कायम राहील, असे फूलविक्रेत्यांचे म्हणणे आहे.
भाजीपाला दर प्रतिकिलो रुपयांत
टोमॅटो १० ते १५, दोडका ५० ते ६०, वांगी ४० ते ५०, कारली ३० ते ४०, ढोबळी मिरची ४० ते ५०, मिरची ६० ते ७०, फ्लॉवर २० ते ३०, कोबी १५ ते २०, बटाटा-२५ ते ३०, कांदा ३० ते ३५, लसूण १५० ते २५०, आले ६० ते ८०, लिंबू १५० ते ३०० शेकडा, गाजर ५० ते ६०, बीन्स ५० ते ६०, गवार ८० ते १००, भेंडी ५० ते ६०, ओला वाटाणा ३० ते ४०, देशी काकडी ७० ते ८०, काठाकाकडी ४० ते ५०, दुधी ३० ते ४०, भाज्या ७ ते १० पेंढी, शेवगा ८ ते १० रुपये नग.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.