Fodder Shortage Agrowon
ॲग्रो विशेष

Fodder Shortage : नगर जिल्ह्यातून चारा इतरत्र नेता येणार नाही

Nagar Agriculture News : नगर जिल्ह्यात दूध उत्पादन, पशुपालनाला शेतकरी प्राधान्य देत आहेत. जिल्ह्यात जवळपास १६ लाखापेक्षा अधिक पशुधन आहे.

Team Agrowon

Nagar News : जिल्ह्यात यंदा पाऊस कमी आहे. दूध उत्पादकांसह पशुधनाची संख्या अधिक असल्याने चारा टंचाई भासू शकते, त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नगर जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात चारा वाहतूक करण्यास जिल्हा प्रशासनाने दोन महिन्यासाठी मनाई केली आहे. जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी तसा आदेश काढला आहे.

नगर जिल्ह्यात दूध उत्पादन, पशुपालनाला शेतकरी प्राधान्य देत आहेत. जिल्ह्यात जवळपास १६ लाखापेक्षा अधिक पशुधन आहे. शेळ्या-मेंढ्या व अन्य पशुधनाची संख्याही अधिक आहे. यंदा खरीप आणि रब्बीत पुरेसा पाऊस नसल्याने पिकांचे नुकसान झाले.

दोन्ही हंगामासह चारा पिकांतून तसेच अन्य स्रोतांतून उत्पादित होणारा चारा पुरेसा नाही.चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण होऊ शकते असा अंदाज गृहीत धरुन प्रशासनाने यंदा चाऱ्याबाबत उपाययोजना करण्याची दोन-तीन महिन्यापूर्वीच सूचना दिल्या होत्या.

जिल्हा नियोजन समितीमधूनही चाऱा उत्पादनासाठी निधी खर्च केला. यंदा रब्बी, उन्हाळी पिके, चारा पिके यातून मिळणारा चारा पुरेसा नसेल. चाऱ्याची गंभीर टंचाई निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाला आहे.

त्यामुळे जिल्ह्यातून दोन महिन्याच्या कालावधीत कोणत्याही प्रकारचा चारा जिल्ह्याबाहेर नेहण्यास मनाई केली आहे. जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी दोन दिवसांपूर्वी तसा आदेश काढला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Farming: प्रतिकूल परिस्थितीतही सोयाबीन उत्पादकता मिळविण्यात शेतकऱ्याला यश

Student Issue: परभणी कृषी विद्यापीठातील विद्यार्थी समस्यांनी त्रस्त

Ativrushti Madat: शेतकऱ्यांना अतिवृष्टीची १५ हजार कोटींची मदत दिली; एकनाथ शिंदेंची विधानपरिषदेत माहिती

CCI Center Corruption: सीसीआय केंद्रावर होतेय शेतकऱ्यांकडे पैशांची मागणी

Crop Loan: सहा बँकेने दिले १६४ कोटींचे पीक कर्ज

SCROLL FOR NEXT