Watermelon Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Watermelon Farming: कलिंगडांचा दर्जा राखण्यावर भर

Modern Farming Techniques: मेहकर (बुलडाणा) येथील मेहबूब परसुवाले यांनी आधुनिक शेती तंत्रांचा अवलंब करत सातत्याने कलिंगड शेतीत यश मिळवले आहे. पाच एकर क्षेत्रात उभारलेल्या या शेती प्रयोगात दर्जेदार उत्पादन देण्यासाठी एकात्मिक शेती व्यवस्थापन, मल्चिंग, ठिबक सिंचन, सेंद्रिय खतांचा वापर यांचा प्रभावी समन्वय साधण्यात आला आहे. थेट विक्रीचे धोरण अवलंबून त्यांनी अडत व वाहतूक खर्च टाळला आहे.

 गोपाल हागे

Watermelon Production:

शेतकरी नियोजन । पीक : कलिंगड

शेतकरी : मेहबूब कासम परसुवाले

गाव : मेहकर ता. मेहकर, जि. बुलडाणा

कलिंगड क्षेत्र : पाच एकर

मेहकर (जि. बुलडाणा) येथील मेहबूब कासम परसुवाले यांनी पाच एकरांत कलिंगड लागवड केली आहे. सध्या लागवड होऊन ६० दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. सध्या कलिंगड लागवडीमध्ये दर्जेदार फळधारणा झालेली आहे. फळे लवकरच तोडणीला येतील. फळ तोडणीपूर्वी कोणत्याही प्रकारची फवारणी घेतली जाणार नाही. आगामी काळात फळांचा दर्जा राखण्यावर भर देण्यात येणार असल्याचे मेहबूब परसुवाले सांगतात.

लागवड नियोजन

लागवडीपूर्वी जमिनीची मशागत करून ३० ट्रॉली चांगले कुजलेले शेणखत शेतात पसरले. यामध्ये ट्रायकोडर्मा, पीएसबी यांचा वापर केला. पुन्हा रोटाव्हेटर फिरवून शेणखत जमिनीत चांगले मिसळून घेतले.

लागवडीसाठी ट्रॅक्टरच्या साह्याने चार फुटांचे बेड तयार केले. बेडवर सिंचनासाठी ठिबकच्या नळ्या अंथरून घेतल्या. त्यानंतर खत नियोजनासाठी सेंच्युरी बसविले.

लागवडीपूर्वी तयार केलेले बेड स्प्रिंकलरने हलके पाणी देऊन सुरुवातीला चांगले भिजवून घेतले. त्यानंतर बेडवर मधोमध माती राहावी म्हणून बैलजोडीच्या साह्याने मशागत केली.

त्यानंतर बेडवर मल्चिंग अंथरून घेतले. मल्चिंग टाकल्यानंतर बेड दोन दिवस ठिबकद्वारे थोडावेळ भिजवून घेतले. त्यानंतर पुन्हा ट्रायकोडर्मा व स्युडोमोनास यांचा ठिबकमधून वापर केला.

कलिंगड रोप लागवडीसाठी ठिबकच्या नळीजवळ सव्वा फूट अंतरावर मल्चिंग पेपरवर छिद्र पाडून घेतले.

रोपांची उपलब्धता करून नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात रोप लागवड केली. लागवडीसाठी साधारण २० ते २२ दिवसांचे रोपांची निवड केली.

लागवड चार बाय चार बाय सव्वा फूट असे अंतर राखत करण्यात आली आहे. अंतर जवळ ठेवण्याचे कारण म्हणजे उन्हापासून फळांना चटके बसू नये तसेच पाल्याचे प्रमाण जास्त राहावे, हा हेतू ठेवून ने हे अंतर ठेवण्यात आले आहे.

खत व्यवस्थापन

पेरणीनंतर पाच दिवसांनी पिकास १९.१९.१९ एकरी पाच किलो प्रमाणे दिले.

दर आठ दिवसांच्या अंतराने १९ः१९ः१९ व १२ः६१ः०, १०ः५०ः०६ आणि १३ः४०ः१३ ही रासायनिक खते ठिबकमधून नियमितपणे देण्यात आली.

कीड-रोग व्यवस्थापन

कलिंगड पिकावर नागअळी व फुलकिड्यांचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यासाठी शिफारशीत रासायनिक घटकांची फवारणी घेण्यात आली. त्यानंतर पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थेत गरजेनुसार कीड नियंत्रणासाठी रासायनिक फवारण्या घेण्यात आल्या आहेत.

पिकाचे नियमित निरीक्षण करण्यावर भर देण्यात आला. कलिंगड लागवडीमध्ये एकात्मिक व्यवस्थापनासाठी पिवळे व निळे चिकट सापळे लावले आहेत.

सध्या फळधारणा झालेली असून फळे लवकरच तोडणीला येतील. तोडणीपूर्वी कोणत्याच प्रकारची रासायनिक फवारणी घेणार नसल्याचे परसुवाले सांगतात.

विक्री नियोजन

मेहबूब परसुवाले मागील सात वर्षांपासून कलिंगड लागवड करत आहेत. मागील दोन वर्षांत एकरी ३० टनांपर्यंत उत्पादन घेण्यात यश मिळविले आहे. या मालाची जागेवरूनच प्रति किलो १० रुपये २५ पैसे दराने विक्री करण्यात आली. यावर्षी देखील दर्जेदार फळधारणा झाली असून चांगले उत्पादन मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे. यावर्षी देखील फळ काढणी जागेवरून करूनच विक्री करण्याचा त्यांचा मानस आहे. थेट विक्री केल्यामुळे अडत, वाहतूक खर्च व इतर मजुरी लागत नाही, त्यामुळे उत्पादन खर्चात बचत होत असल्याचा त्यांचा अनुभव आहे.

- मेहबूब परसुवाले, ७०५७४७९५५५

(शब्दांकन : गोपाल हागे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT