Watermelon Cultivation : आमराईत कलिंगडाचे आंतरपीक

Mango Farming : दुर्गम तालुक्यातील शेतकरी नवनवीन प्रयोग करीत वेगवेगळी पिके घेत आहेत. कृषी विभागाच्‍या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी जलकुंड उभारून भातशेतीसह फळ लागवड केली जात आहे.
Watermelon Cultivation
WatermelonAgrowon
Published on
Updated on

Poladpur News : दुर्गम तालुक्यातील शेतकरी नवनवीन प्रयोग करीत वेगवेगळी पिके घेत आहेत. कृषी विभागाच्‍या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी जलकुंड उभारून भातशेतीसह फळ लागवड केली जात आहे.

तालुक्यातील गोळेगणी गावातील शेतकरी नामदेव येरूणकर यांनी जलकुंडाच्या आधारे ०.८० हेक्टरवर फळबाग लागवड करीत माळरानावर हिरवीगार आमराईत कलिंगडाचे आंतरपीक घेऊन अतिरिक्त उत्पन्न मिळवले आहे.

Watermelon Cultivation
Watermelon Cultivation : कमी गुंतवणुकीत जास्त उत्पादन देणाऱ्या कलिंगडाचे लागवड तंत्र

पोलादपूर हा दुर्गम-डोंगराळ तालुका असून पर्जन्यमान ३२००-३५०० मिलिमीटर आहे. याठिकाणी मुख्य पीक भात व नाचणी आहे. नैसर्गिक असमतोल, वन्यपशूंच्या उपद्रवामुळे उत्पादन कमी होत असल्‍याने अनेक शेतकऱ्यांनी शेतीकडे पाठ फिरवून नोकरी-व्यवसायासाठी स्‍थलांतर केले आहे.

पोलादपूर तालुक्यातील गोळेगणी गाव टंचाईग्रस्त म्‍हणून ओळखले जाते; मात्र याठिकाणी कृषी विभागाच्या नावीन्य उपक्रमांतर्गत जलकुंडाची निर्मिती करत येरूणकर यांनी पारंपरिक शेतीला बगल देत माळरानावर आंबा लागवड केली. त्‍याचा आदर्श गावातील इतर शेतकरीही घेत आहेत.

Watermelon Cultivation
Watermelon Cultivation : आगाप कलिंगडास फटका; लागवड सुरूच

कोरोना काळात कृषी सहाय्यक मनोज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली माळरानावर पाच बाय ५०२ मीटर आकारमानाचा खड्डा खोदून पावसाळ्यापूर्वी प्लॅस्टिक अस्तरीकरण केले. त्‍यासाठी एकूण २४ हजार रुपये खर्च आला. पावसाळ्यामध्ये जलकुंडांमध्ये सुमारे ३२ ते ३५ हजार लिटर साठवण करून महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत माळरानावर ०.४० हेक्टर क्षेत्रावर आंब्‍याची लागवड केली.

मिरची, कलिंगड, कोबी इत्यादी आंतरपीक घेतल्‍याने तसेच राष्ट्रीय कोरडवाहू विकास कार्यक्रमांतर्गत दुग्धव्यवसाय व कुक्कुटपालन यांची जोड देत शेती व्यवस्थापन केल्‍याने अनेकांच्या उत्‍पन्नात वाढ झाली आहे.

तीन वर्षांत २०० आंबा कलमांची लागवड केली आहे. याशिवाय जोड व्यवसाय म्‍हणून दोन गीर गाई, ५० कोंबड्यांचे संगोपन केले. गांडूळ खत युनिटही उभारले आहे. पुढील वर्षी आंबा पिकातून दोन ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल, असा विश्‍वास आहे.
- नामदेव येरूणकर, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com