Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्या ः पालकमंत्री पाटील

Heavy Rain Crop Loss: नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी दिले.

Team Agrowon

Buldana News : बुलडाणा जिल्ह्यातील लोणार, सिंदखेडराजा आणि मेहकरसह इतर तालुक्यांमध्ये मागील काही दिवसांत झालेल्या पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होऊन शेतपिकांचे, घरांचे, जनावरांचे, विहिरींचे आणि रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी दिले. शुक्रवारी (ता. १) अतिवृष्टीग्रस्त गावांचा दौरा करून परिस्थितीची पाहणी पालकमंत्री पाटील यांनी केली.

या वेळी त्यांच्यासोबत आमदार मनोज कायंदे, आमदार सिद्धार्थ खरात, माजी आमदार संजय रायमुलकर, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, उपमुख कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, तहसीलदार भूषण पाटील यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील यांनी लोणार तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ, सिंदखेडराजा तालुक्यातील बिंबीखेळ आणि मेहकर तालुक्यातील वडगाव तेजन, डोणगांव या गावांना भेट देत शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.

त्यांनी नुकसानग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करीत संबंधित अधिकाऱ्यांकडून नुकसानीबाबतची माहिती घेतली. या वेळी त्यांनी तत्काळ पंचनामे करून स्थानिक स्तरावर मदत देण्याचे आणि शासन स्तरावर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, पालकमंत्र्यांनी लोणार सरोवराचीही पाहणी करीत पर्यटकांसाठी सुविधा वाढवण्यासंबंधी सूचना दिल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli Market Road Issues: विष्णूअण्णा पाटील फळ मार्केटच्या सुविधांवर पाणी

Fake Fertilizer: बोगस खतविक्रीप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

Vanashree Award: भोकणीला वन विभागाचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार

Ashadhi Wari 2026: आषाढी वारीसाठी धुळ्यातून २१५ विशेष बस

Agrowon Podcast: हरभरा दरात चढ-उतार ,ज्वारीच्या आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार, शेपू दरात स्थिरतातर केळीच्या आवकेत घट

SCROLL FOR NEXT