Kach River Flood Agrowon
ॲग्रो विशेष

Kach River Flood : काच नदीला आलेल्या महापुराचा अंचळ परिसराला तडाखा

Washim Flood : काच नदीला आलेल्या जोरदार पुरामुळे अंचळ गावाजवळील नाल्यावर असलेला पूल पूर्णतः वाहून गेला. या मार्गावरील वाहतूक तब्बल १० ते १२ तास ठप्प झाली होती.

Team Agrowon

Washim News : या भागात दोन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे अनेक भागांत पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. केनवडपासून जवळ असलेल्या अंचळ परिसरातील काचनदीला आलेल्या पुरामुळे कुकसा-मांगुळझनक मार्गावरील पूल वाहून गेला. या घटनेने फक्त वाहतूकच नव्हे, तर स्थानिक शेतकऱ्यांचेही नुकसान झाले.

काच नदीला आलेल्या जोरदार पुरामुळे अंचळ गावाजवळील नाल्यावर असलेला पूल पूर्णतः वाहून गेला. या मार्गावरील वाहतूक तब्बल १० ते १२ तास ठप्प झाली होती. परिणामी, नागरिक, विद्यार्थी, रुग्ण यांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागले.

प्रशासनाचे दुर्लक्ष आणि उदासीनतेमुळे परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर मुरूम टाकून तात्पुरती वाहतूक व्यवस्था सुरू करण्यात आली. परंतु तीही अत्यंत असुरक्षित असल्याचे चित्र आहे. संतोष इंगळे यांची केळीची लागवड वाहून गेली. या नैसर्गिक आपत्तीत सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

पिंपरी सरहद्द, अंचळ आणि काचनदीच्या काठच्या गावांमधील शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहेत.पिंपरी सरहद्द येथील शेतकरी संतोष इंगळे यांच्या तीन हजार केळीच्या रोपांची लागवड पुरात पूर्णपणे वाहून गेली. या नुकसानीने त्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.

याशिवाय, काच नदी व उतावळी नदीच्या काठच्या शेतांमध्ये चार ते पाच फूट खोल खड्डे पडले असून, शेतांची वरची सुपीक मातीही वाहून गेली आहे. जमीन नव्याने तयार करण्यासाठी मोठा खर्च लागणार आहे. प्रशासनाने गांभिर्याने याची दखल घेण्याची मागणी केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Cultivation Issue: केळी लागवडीसाठी दर्जेदार कंद मिळेनात

Groundnut Seed Issue: ‘कृषी’कडून वितरित भुईमूग बियाण्यांवर शेतकऱ्यांची नाराजी; गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

Shaktipeeth Highway Protest: शक्तिपीठ महामार्गाविरोधात विट्यात महिलांचा मोर्चा

Agri Power Supply Issue: शेतीसाठी सलग सहा तास वीज द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Cattle Conservation: गोवंश संवर्धनाचा भार शेतकरी-गोपालकांवर पडू नये; खासदार मेधा कुलकर्णी यांची अपेक्षा

SCROLL FOR NEXT