Agriculture Power Bill agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Power Bill : कृषी वीज बिले दुरूस्त करा अन्यथा आंदोलन, इरिगेशन फेडरेशनकडून इशारा

Agriculture Power Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील वीज ग्राहक जोडभार व वीज बिल दुरुस्तीचे अर्ज करीत आहेत, पण महावितरण कार्यालयाकडून वीज ग्राहकांना ऑनलाईन अर्ज करणेबाबत सुचविले जात आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Farmers : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील सर्वच कृषिपंप वीज ग्राहकांची शेतीपंपाची वीज बिले अवाजवी, चुकीची देण्यात आली आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील वीज ग्राहक जोडभार व वीज बिल दुरुस्तीचे अर्ज करीत आहेत, पण महावितरण कार्यालयाकडून वीज ग्राहकांना ऑनलाईन अर्ज करणेबाबत सुचविले जात आहे. ते चुकीचे व अन्यायकारक आहे सदर ग्राहकांचे प्रत्यक्ष अर्ज स्विकारुन समक्ष जागेवर येऊन व स्थळ तपासणी करुन वीज बिले व थकबाकी रक्कम दुरूस्त करुन अचूक जोडभार, अचूक बिल व अचूक थकबाकी रक्कम निश्चित करावी. अन्यथा या विरोधी तीव्र आंदोलन करू असा इशारा इरिगेशन फेडरेशनच्या शिष्टमंडळाने काल (ता.१९) निवेदनाद्वारे महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्निल काटकर व अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांना दिला.

निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, काही कृषिपंप वीज ग्राहकांची मिटर रिडींग प्रमाणे बिलींग नसून अवाजवी व सरासरी जादा आकारणी केलेली आहे. मीटर बंद आहे म्हणून सरासरी बिलींगच्या नावाखाली जादा आकारणी केलेली आहे, मीटर नाही तथापि जादा जोडभार (एच.पी.) दाखवून त्यानुसार जादा आकारणी केली जात आहे.

या सर्व बाबींची वीज ग्राहकाच्या अर्जाप्रमाणे दुरुस्त करुन द्याव्यात. तसेच ज्या ग्राहकांचे मीटर असूनही एच.पी.वरती वीज बिलाची आकारणी होत आहे, त्यांची मीटरवरती बिलाची आकारणी करणेत यावी. ज्यांची मीटर महापूर व अन्य कारणामुळे खराब व नादुरुस्त आहेत त्यांची मिटर महावितरण कंपनीने स्वतः स्वखर्चाने बसवून देऊन त्याप्रमाणे अचूक रिडींगचे वीज बिले द्यावीत या मागण्या करण्यात आल्या आहेत.

यावर महावितरण कडून लेखी अर्ज स्वीकारले जातील आणि स्थळ पाहणी करून बिल दुरुस्तीची कारवाई करू असे आश्वासन मुख्य अभियंता श्री काटकर यांनी दिले, तसेच शेतकऱ्यांनी अपघात होऊ नये याकरिता शेतात जाताना रोज सावधपणे डांबावरील वायर तुटलेली नाही याची खात्री करणे, खांबाला जनावरे बंधू नये अशा प्रकारे सावधानता बाळगवी जेणेकरून अपघात टाळता येतील असे सुचविले.

यावेळी वीजतज्ञ प्रताप होगाडे, विक्रांत पाटील-किनीकर, चंद्रकांत पाटील- पाडळीकर, जावेद मोमीन, सचिव मारुती पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Local Body Elections: सोलापुरात ‘आयात’ नेत्यांच्या जोरावर भाजपची मोर्चेबांधणी

E Crop Survey: रब्बी हंगामातील ४ लाख ५ हजार हेक्टर क्षेत्राची ई-पीक पाहणी बाकी

Maharashtra Elections 2026 Exit Poll: 'भाजप'चेच वर्चस्व; मुंबई ठाकरेंच्या हातून निसटणार, एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?

Cotton Rate: कापसाच्या भावात चढ उतार कशामुळे सुरू आहेत?

Livestock Health: बळीराजाचे पशुधन संसर्गजन्य रोगामुळे संकटात

SCROLL FOR NEXT