Sugarcane Season Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season 2024 : खानदेशात पाच साखर कारखान्यांकडून गाळपाची तयारी

Sugarcane Harvesting : खानदेशात उसाखालील क्षेत्र स्थिर आहे. परंतु यंदा ऊस तोडणी निवडणुकीच्या धामधुमीत लांबली आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात उसाखालील क्षेत्र स्थिर आहे. परंतु यंदा ऊस तोडणी निवडणुकीच्या धामधुमीत लांबली आहे. आता पुढील महिन्यात ऊस तोडणी सुरू होईल, अशी स्थिती असून, तोडणीची तयारी पूर्ण झाल्याचे दिसत आहे.

नंदुरबार जिल्ह्यात उसाची १४ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. खानदेशात ऑक्टोबरच्या अखेरीस साखर कारखाने सुरू होतील, असे संकेत होते. परंतु दिवाळी व लागलीच विधानसभा निवडणूक अशी लगबग सुरू झाली.

यात गाळप हंगाम लांबला. पण कारखाने डिसेंबरच्या सुरुवातीला सुरू होणार आहेत. यामुळे गाळपासंबंधी कार्यवाही गती घेईल. तसेच गाळप सर्व क्षेत्रांतील उसाचे होईल, असे दिसत आहे. मागील हंगामातही गाळप वेगात झाले होते.

मध्यंतरी खानदेशातील ऊस लागवड १५ हजार हेक्टरवर खाली आली होती. परंतु मागील तीन वर्षांत उसाखालील क्षेत्रात वाढ झाली. जळगाव जिल्ह्यात मागील हंगामातही १२ हजार हेक्टरवर ऊस पीक होते. यंदाही १२ हजार हेक्टरवर जळगावात ऊस आहे. धुळे जिल्ह्यात चार हजार हेक्टरवर ऊस आहे. यात साक्री व शिरपूर तालुक्यांत ऊसलागवड अधिक आहे. नंदुरबारमध्ये १४ हजार हेक्टरवर ऊस असून, शहादा, तळोदा व नवापूर तालुक्यांत ऊस पीक अधिक आहे.

नंदुरबार जिल्ह्यात तीन साखर कारखाने सुरू होणार आहेत. यातील समशेरपूर (ता. नंदुरबार) येथील कारखाना गाळपात आघाडी घेतो. या कारखान्याने सर्वाधिक ऊस गाळप मागील हंगामात केले आहे. जळगाव जिल्ह्यात दोन साखर कारखाने सुरू होणार आहेत. त्यात घोडसगाव (ता. मुक्ताईनगर), चहार्डी (ता. चोपडा) हे कारखाने सुरू होणार आहेत.

नंदुरबारमध्ये डोकारे (ता. नवापूर), समशेरपूर (ता. नंदुरबार), पुरुषोत्तमनगर (ता. शहादा) हे कारखाने सुरू होणार आहेत. तसेच तळोदा तालुक्यात एक खांडसरी सुरू होईल. पुढेही खानदेशात १०० टक्के उसाचे गाळप होईल, असे चित्र आहे. यामुळे ऊस लागवड स्थिर आहे. काही भागांत ऊसलागवड कमी झाली आहे.

परंतु काही भागांत ऊसलागवड वाढली आहे. यामुळे क्षेत्र स्थिर आहे. जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव, भडगाव भागात ऊसलागवड किंचित वाढली आहे. यावल भागातही ऊसलागवड किंचित वाढल्याचे दिसत आहे.

पण चोपडा भागात ऊसलागवड कमी झाल्याची माहिती मिळाली आहे. धुळ्यातील शिरपुरातही ऊसलागवड किंचित वाढली आहे. परंतु धुळे तालुक्यातील क्षेत्र कमी झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यात पाच हजार हेक्टरवर ऊसलागवड झाली आहे. यापाठोपाठ नवापूर तालुक्यात ऊस पीक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: ‘त्या’ शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ; कृषिमंत्री भरणे यांची विधानसभेत माहिती

Monsoon Rain: पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांत पावसाचा जोर

Defective Groundnut Seeds: निकृष्ट भुईमूग बियाणे बदलून मिळणार; कृषिमंत्र्यांच्या निर्देशाने शेतकऱ्यांना दिलासा

Dimbhe Dam Reservoir: डिंभे धरणक्षेत्रात ६७ मिमी पाऊस; पूर्व भागातील शेतकरी अजूनही जोरदार सरींच्या प्रतीक्षेत

Monsoon Alert: मॉन्सूनच्या पावसाला दमदार सुरुवात

SCROLL FOR NEXT