Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department : पाच ‘एसएओं’ना मिळणार सहसंचालकपदी पदोन्नती

Latest Agriculture News : राज्याच्या कृषी खात्यात यंदा पाच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना (एसएओ) यावर्षात सहसंचालकपदी बढती मिळण्याची शक्यता आहे.

मनोज कापडे

Pune News : राज्याच्या कृषी खात्यात यंदा पाच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना (एसएओ) यावर्षात सहसंचालकपदी बढती मिळण्याची शक्यता आहे. कृषी सहसंचालक संवर्गात मूळ आकृतिबंधात केवळ १४ पदे आहेत. परंतु, प्रतिनियुक्तीच्या पाच पदांनाही मान्यता दिली गेली आहे. त्यामुळे खात्यात आता सहसंचालकांची एकूण पदे १९ झालेली आहेत.

अर्थात, त्यातील अवघी १४ पदे सध्या भरलेली आहेत. पाच पदे भरलेली नसताना नव्या वर्षात पुन्हा जुलैपर्यंत अजून पाच सहसंचालक निवृत्त होत आहेत. त्यामुळे एसएओंना पदोन्नती देण्यासाठी यंदा बऱ्यापैकी वाव आहे. अर्थात, राज्य शासनाकडून पदोन्नतीची प्रक्रिया वेगाने होते की निवडणूक आचारसंहितेत पदोन्नती अडकते याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष लागून आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कृषी खात्याचे बहुतेक कामकाज आता डिजिटल प्रणालीकडे गेले आहे. परंतु, या प्रणालीसाठी स्वतंत्र मनुष्यबळ आकाराला न आणता आधीसारखेच कागदपत्रांवर आधारित कामकाज करणारी प्रशासकीय रचना ठेवण्यात आलेली आहे.

कृषी खात्यातील सहसंचालकांच्या कामाची पुनर्रचना करण्याची वेळ आता पाहिजे. संगणक प्रकल्प व डिजिटल विभागासाठी स्वतंत्र सहसंचालक नियुक्त करुन त्याच्या अखत्यारीत एसएओ व उपसंचालकांचा चमू देण्याची गरज आहे.

दरम्यान, राज्यातील एसएओ पदाच्या २४ जागा हेतुतः रिक्त ठेवल्यामुळे अधिकारी नाराजी व्यक्त करीत आहेत. नाशिकमधील ३, कोकण २, नागपूर १, अमरावती १, छत्रपती संभाजीनगर ४ तर पुणे विभागात १३ जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. रिक्त जागा भरण्यासाठी यापूर्वीसारखीच आर्थिक अडवणूक चालू झाल्यामुळे नियुक्त्या रखडल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

या पाच सहसंचालकांना निवृत्तीचे वेध

संतोष आळसे (प्रकल्प संचालक, डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियान), पांडुरंग शेळके (मृदसंधारण व पाणलोट क्षेत्रविकास व्यवस्थापन), मोहन वाघ (विभागीय कृषी सहसंचालक, नाशिक), ज्ञानेश्वर बोटे (अतिरिक्त प्रकल्प संचालक, स्मार्ट प्रकल्प), मारुती चपळे (उपायुक्त, मनरेगा, नागपूर).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Santosh Kakde: चिखलीचे तहसीलदार संतोष काकडे विभागात अव्वल 

Agriculture Scheme: जुनी विहीर दुरुस्तीसाठी १ लाखांपर्यंत अनुदान; शेतकऱ्यांसाठी विशेष योजना

Farmer loan Waiver: कर्जमाफीसाठी मुंबई एकदिवस बंद करा; बच्चू कडू यांची राज ठाकरेंकडे मागणी 

Forest Encroachment: वनजमिनीवर अतिक्रमणकर्त्यांवर फौजदारी

Ambajogai KVK: अंबाजोगाई केव्हीकेमध्ये ‘किसान गोष्टी’