Sand Policy Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Sand Policy : स्वस्तात वाळूसाठी सोलापुरात भीमा नदीतील पाच ठिकाणे निश्‍चित

Sand Rate : स्वस्तात वाळू देण्याच्या धोरणानुसार जिल्ह्यातील वाळूची ठिकाणे निश्‍चित करण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे.

Team Agrowon

Solapur Sand Update : स्वस्तात वाळू देण्याच्या धोरणानुसार जिल्ह्यातील वाळूची ठिकाणे निश्‍चित करण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. त्यानुसार भीमा नदीवरील पाच ठिकाणी वाळूउपसा होणार आहे. यामध्ये वाफेगाव, उंबरे, जांभूड, गुरसाळे आणि चळे या ठिकाणांचा समावेश आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिली.

शासनाच्या महसूल आणि वन विभागामार्फत वाळू आणि रेतीचे उत्खनन साठवणूक व ऑनलाइन प्रणालीद्वारे विक्री करण्याबाबतचे धोरण जाहीर केले आहे. तसेच सहाशे रुपये दराने नागरिकांना वाळू देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नव्या धोरणानुसार आपत्तिजनक परिस्थिती उद्‍भवू नये, म्हणून ज्या ठिकाणी नदीपात्रामध्ये गाळाचे संचयन झाले आहे, अशा ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून जलसंपदा विभागाचा अभिप्राय व त्यांच्याकडील प्रस्ताव प्राप्त करून घेऊन त्या ठिकाणी वाळू उत्खनन करण्याबाबतची तरतूद करण्यात आली आहे.

त्या अनुषंगाने जिल्ह्यातील भीमा नदीपात्राचा विचार करता नदीपात्रातील गाळाचे संचयन झाल्यामुळे ज्या ठिकाणी पूरस्थिती उद्‍भवू शकते, अशा ठिकाणांबाबतची माहिती विचारण्यात आली होती.

त्यानंतर जलसंपदा विभागाच्या पत्रानुसार भीमा नदीवरील पाच ठिकाणे पूरपरिस्थिती उद्‍भवू शकतात, अथवा त्या ठिकाणी गाळ काढला, तर त्या ठिकाणी नदीपात्र सरळीकरण होऊ शकते. तसेच पुराची आपत्ती निर्माण होऊ शकणार नाही, असे सूचित केले आहे, असे त्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT