Nanded APMC Election Agrowon
ॲग्रो विशेष

Nanded APMC Election : नांदेडसह पाच बाजार समितीच्या निवडणुका जाहीर

निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने सर्वच पक्षातील प्रस्थापित नेत्यांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे.

Team Agrowon

Nanded News : जिल्ह्यातील नांदेड, कुंटुर, नायगाव, भोकर आणि हिमायतनगर या पाच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची घोषणा (Nanded Agricultural Produce Market Committee Election) झाली आहे. सोमवारपासून (ता. २७) उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुरवात झाली.

निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्याने उत्सुक उमेदवार कामाला लागले आहेत. त्यामुळे भर उन्हाळ्यात निवडणुकीचे वातावरण तापणार आहे.

नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय वातावरण तापायला सुरवात झाली आहे.

नांदेड बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात अर्धापूर व नांदेड या दोन ‌तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती व सेवा सहकारी सोसायटीचा व मुदखेड तालुक्यातील काही गावांच्या समावेश होतो.

या समितीवर गेल्या काही दिवसांपासून प्रशासक आहे. विद्यमान संचालकांचा कार्यकाळ संपून सुमारे दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या ना त्या कारणाने निवडणुकीला स्थगिती मिळाली होती. त्यामुळे स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना या निवडणुकीची मोठी उत्सुकता होती.

निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने सर्वच पक्षातील प्रस्थापित नेत्यांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. या निवडणुकीत सोसायटी मतदारसंघातून ११ संचालक निवडून देण्यात येणार आहेत.

यात सर्वसाधारण गटातून सात, दोन महिला, एक ओबीसी, एक भटके विमुक्त प्रवर्गातून एक संचालक निवडून देण्यात येणार आहे.

ग्रामपंचायत मतदार संघातून चार संचालक निवडून देण्यात येणार आहेत. यात दोन सर्वसाधारण गटातून, एक अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून, एक आर्थिकदृष्ट्‌या दुर्बल घटकातून एक संचालक निवडून देण्यात येईल. आडते व व्यापारी गटातून दोन, हमाल मापारी गटातून एक असे एकूण १८ संचालक निवडून देण्यात येणार आहेत.

निवडणूक कार्यक्रम

या बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रमामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणे : २७ मार्च ते ता. तीन एप्रिल, उमेदवारी अर्जांची छाननी : ता. पाच एप्रिल, उमेदवारी अर्ज मागे घेणे : ता. सहा ते ता. २० एप्रिल, मतदान : ता. २९ एप्रिलला आणि ता. ३० एप्रिलला मतमोजणी करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rohit Pawar On Ajit Pawar: '...तर अजितदादा मुख्यमंत्री झाले असते'; रोहित पवार विधानसभेत काय म्हणाले?

Cotton Market Rate: जाणून घ्या; आजचे सोयाबीन, कापूस, पपई, मका आणि केळीचे बाजारभाव

Maize Procurement: सांगोल्यात २१ हजार क्विंटल मका खरेदीविना पडून

Maharashtra Farmer Issues: पीक विमा, अतिवृष्टी सरकारसाठी अडचणीचे

Supreme Court verdict: २०१८ पूर्वीची बंद झालेली जमीन अधिग्रहण प्रकरणे पुन्हा उघडता येणार नाहीत; सर्वोच्च न्यायालय

SCROLL FOR NEXT