Electricity Connection Agrowon
ॲग्रो विशेष

Electricity Connection : पाच वर्षांत पाच लाख वीज जोडण्या

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : एप्रिल २०१९ ते डिसेंबर २०२३ या जवळपास पाच वर्षांच्या कालावधीमध्ये महावितरण बारामती परिमंडलाने तब्बल पाच लाख दोन हजार ९१६ इतक्या विक्रमी वीजजोडण्या देण्याचे काम केले आहे. यात कृषीच्या एक लाख नऊ हजार ७२ वीजजोडण्यांचा समावेश आहे.

परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एक दिवस, एक गाव’, ‘मागेल त्याला कनेक्शन’ अशा विविध मोहिमा राबविल्याने हे यश साध्य झाले आहे. परिणामी महावितरणच्या महसुलात मोठी वाढ झाली आहे.

बारामती परिमंडलात पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर व भोर तालुके, तर सातारा व सोलापूर हे जिल्हे येतात. श्री. पावडे यांनी परिमंडलाचा पदभार घेतल्यापासूनच ग्राहकाभिमुख सेवेला महत्त्व दिले. ग्राहकाला वेळेत वीजजोडणी दिली, त्याचे बिलिंग अचूक केले तर ग्राहक पैसे भरण्यास मागेपुढे पाहत नाही हा विश्वास त्यांना होता. त्यामुळे श्री. पावडे यांनी योग्य नियोजन केले.

गावागावात कॅम्प लावून वीजजोडण्या दिल्या. ३१ मार्च २०१९ अखेरीस परिमंडलाची ग्राहक संख्या सुमारे २४ लाख ८९ हजार ९४२ इतकी होती. डिसेंबर २०२३ अखेरीस ग्राहक संख्येत २० टक्के वाढ झाली, हे विशेष एकूण ५ लाख २ हजार ९१६ वीजजोडण्या देण्याचे काम झाले आहे. यामध्ये कृषीच्या १ लाख ९ हजार ७२, तर बिगरशेतीच्या ३ लाख ९३ हजार ८४४ वीजजोडण्यांचा समावेश आहे.

तीस मीटर अंतरातील कृषी जोडणी तत्काळ

ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीचे किंवा बोअरवेलचे अंतर महावितरणच्या अस्तित्वात असलेल्या वीज यंत्रणेपासून ३० मीटरच्या आत आहे. त्यांना २४ तासांत कनेक्शन देण्याचे काम सुरू आहे. या अंतरातील प्रलंबित वीज जोडण्यांची संख्या शून्यावर आहे. नव्याने ज्यांना ३० मीटरच्या आतील जोडणी हवी असेल त्या शेतकऱ्यांनी स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधून अर्ज करावा. ३० मीटर ते २०० मीटर अंतरावर जोडणी देण्याचे कामही निधीनुसार केले जात आहे.

सोमेश्वर उपविभागाची नेत्रदीपक कामगिरी

बारामती तालुक्यातील सोमेश्वर उपविभागाची वाटचाल दोन पावले पुढे आहे. उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता संतोष चव्हाण यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात ‘गतिमान वीज जोडणी अभियान’ राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष घरांची संख्या व तिथे वीज जोडणी आहे का याची खात्री केली.

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सर्व्हे तब्बल ५ हजारांहून अधिक जोडण्या तपासल्या. १२०० अनधिकृत आकडे काढून त्यांना वीजजोडणी घेण्यास प्रवृत्त केले. २८८ शेतीपंपाची प्रत्यक्ष अश्वशक्तीनुसार नोंद केली.

ज्यामुळे वाढीव भार १६१०, तर नवीन कनेक्शनमुळे ४००० असा ५६१० अश्वशक्तीचा भार अधिकृतपणे यंत्रणेत आला. सर्वेक्षणामुळे १३६८ घरगुती कनेक्शन वाढले. त्यांचे हे अभियान अजून थांबलेले नाही. प्रत्येक घरापर्यंत पोहोचून ते कनेक्शन वाढविण्याचे काम करत आहेत.

वर्षनिहाय झालेल्या वीजजोडण्या

वर्ष --- वीज जोडण्या

२०१९-२० --- ९९ हजार ४३३,

२०२०-२१ --- ७१ हजार ६०१,

२०२१-२२ --- १ लाख १३ हजार ५३७,

२०२२-२३ --- १ लाख २५ हजार ९५२

२०२३-२४ (डिसेंबर अखेर) --- ९२ हजार ३९३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT